Tuesday, February 27

Viral news : अरे बापरे! रेल्वेने थेट बजरंगबलींना नोटीस बजावली, कारवाईचा दिला इशारा

Last Updated on February 13, 2023 by Jyoti S.

Viral news : भारतीय रेल्वेने मध्य प्रदेशात एक अजब नोटीस जारी केली आहे, मंदिरात बसलेल्या भगवान बजरंग बलीला रेल्वेने नोटीस बजावली आहे.

भारतीय रेल्वेने मध्य प्रदेशात एक अजब नोटीस जारी केली आहे, मंदिरात बसलेल्या भगवान बजरंग बलीला रेल्वेने नोटीस बजावली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नोटीसमध्ये अतिक्रमणाचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच हे अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या ग्वाल्हेर-श्योपूर ब्रॉडगेज(Viral news) मार्गाचे काम सुरू आहे. मुरैना जिल्ह्यातील सबलगड तहसीलमध्ये ब्रॉडगेज लाइनच्या मध्यभागी भगवान हनुमानजींचे मंदिर येत आहे. हे मंदिर रेल्वेची जमीन असल्याचेही सांगण्यात येत आहे, त्यामुळे भारतीय रेल्वेने भगवान बजरंगबलीला नोटीस बजावली आहे. तशी नोटीसही मंदिराला देण्यात आली आहे.

हेसुद्धा वाचलात का?

Viral video : MSEB अधिकारी हे वीज तोडायला शेतात आले; अनं मराठी शेतकऱ्याने इंग्रजीत फुल्ल झापलं बघा व्हिडिओ


या नोटीसमध्ये भगवान हनुमानजींना लिहिले आहे की, रेल्वेच्या जमिनीवर मंदिर बांधून जे काही अतिक्रमण केले आहे, ते ७ दिवसांत हटवा अन्यथा आवश्यक कारवाई केली जाईल. ही नोटीस मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत रेल्वेच्या(Viral news) जागेवरील अतिक्रमण हटवा आणि रेल्वेची जागा रिकामी करा, अन्यथा प्रशासन तुमच्याकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करेल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचलात का?

Viral Video : ‘वेलेंटाइन डे’साठी उंदीर लागला आता कामाला, थेट गर्लफ्रेंडसाठी दुकानातून चोरला हार पहा व्हिडिओ!!

बजरंग बाली यांना बजावलेल्या या नोटिसीची प्रत सहाय्यक विभागीय अभियंता ग्वाल्हेर आणि जीआरपी स्टेशन प्रभारी ग्वाल्हेर यांनाही पाठवण्यात आली आहे. ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.