Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
A train on hydrogen: डिसेंबर २०२३ मध्ये धावणार हायड्रोजनवरील रेल्वे
देशापुढील प्रदूषणाचे गंभीर रोखण्यासाठी सौरऊर्जा अभियान, इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन याबरोबरच आता केंद्र सरकार हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या पर्यायाकडे वळले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून हायड्रोजनपासून(A train on hydrogen) मिळणाऱ्या ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वे उभारणीचे काम सुरू आहे. आगामी वर्षाअखेरीस म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये ही नवी रेल्वे भारतीय मार्गावर धावण्याचे नियोजन आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली.

हायड्रोजनपासून(A train on hydrogen) मिळणाऱ्या ऊर्जेवर चालणाऱ्या रेल्वेच्या डिझाईनचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. आगामी वर्षात मे अथवा जूनमध्ये ते पूर्ण होईल. या रेल्वेचे ‘वंदे मेट्रो’ असे नामकरण करण्यात आले आहे. या गाड्यांच्या निर्मितीला सुरुवात झाली, की मोठ्या प्रमाणात त्यांचे उत्पादन घेण्याचा मानस केंद्राचा आहे.
हेही वाचा: New Year 2023: नवे वर्ष,नवे नियम,1जानेवारी 2023 पासून या क्षेत्रात होणार मोठे बदल!!

जगातील १०० प्रदूषित शहरांमध्ये भारतातील राजधानी दिल्लीसह ६४ शहरांचा समावेश आहे. प्रदूषण रोखण्यासाठी पारंपरिक इंधनाला पर्याय शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर्मनीने यावर्षी जुलैमध्ये हायड्रोजनवर चालणारी जगातील पहिली रेल्वे रुळावर धावण्याचा मान मिळविला. या एका गाडीची किंमत सुमारे ६५० कोटी रुपये इतकी आहे.