Last Updated on December 22, 2022 by Jyoti S.
Board education :आता फक्त बारावीलाच बोर्ड परीक्षा असणार, नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जाणून घ्या..
आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार, पदवी ही चार वर्षांची करण्यात आली आहे. त्यामुळे आता माध्यमिकचा शेवटचा वर्ग हा अकरावी ठरणार असून दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द होणार आहे आणि फक्त आता बारावीची बोर्डाची परीक्षा होणार आहे.
उच्च माध्यमिक कायमचे बंद
नव्या शैक्षणिक(Board education) धोरणानुसार, पूर्व प्राथमिकचा पहिला टप्पा पहिली ते पाचवी असणार आहे , तर प्राथमिकचा दुसरा टप्पा सहावी ते आठवी असणार आहे , त्यानंतर माध्यमिकचा नववी ते अकरावी, असे एकूण टप्पे असतील. तर नवीन शैक्षणिक धोरणानुसार बारावी आता पदवीला जोडली जाणार असून, त्यामुळे आता उच्च माध्यमिकचा टप्पा नसेल.
शेवटच्या वर्षी अकरावी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य होते. मात्र, बारावीला बोर्डाची परीक्षा जाहीर केल्याने आता प्राथमिक व माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षाच होतील. या निर्णयाचा फटका माध्यमिक शाळांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात अली आहे.हेही वाचा: Nashik HSC/SSC: बारावीचे 74,146 विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा
सध्याचे शैक्षणिक धोरण (Board education)1986 पासून राबवण्यात येत होते. आता त्यात पुढील नवीन शैक्षणिक वर्षापासून (2022-23) बदल होणार आहेत. नव्या धोरणानुसार, आता 5+3+3+4 असे शैक्षणिक टप्पे असणार आहेत.