
Last Updated on December 30, 2022 by Jyoti S.
Cold in Maharashtra : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, शेजारील राज्यांमध्ये पावसाच्या सरी…!!
यंदा निसर्गाचा लहरीपणा समजेनासा झाला आहे.आजकाल कधी थंडी, तर कधी खूपच उकाडा, अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव येत आहे. मात्र, आता लवकरच थंडीचा कडाका वाढण्याची दाट शक्यता आहे.
गोंदियात सर्वात कमी तापमान
राज्यात(Cold in Maharashtra) सर्वात कमी तापमानाची नोंद विदर्भात झाली असून, गोंदियामध्ये कमाल तापमान 29.4 अंश, तर किमान तापमान 10.4 अंशावर आहे.आता आपल्या नागपुरातही पारा उतरला आहे आणि , नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
महाराष्ट्रातील तापमानात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झाली असली, तरी वातावरणात मोठ्या प्रमाणात संमिश्र बदल जाणवत आहेत.आता राज्यातील भागांमध्ये 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमान घटले आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी खूपच चांगली असल्याचे बोलले जात आहे .
हेही वाचा : Modi Tweet: नरेंद्र मोदींनी यांनी ऋषभ पंत बद्दल व्यक्त केली खंत ….
उत्तर भारतात खूपच थंडी(Cold in Maharashtra) वाढली असली, तरीहि महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटक, केरळ, नागालँड या राज्यांमध्येही हलका स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. इशान्य भारतातही पावसाचा शिरकाव होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.