Maharashtra: महाराष्ट्रात ग्रामसेवक पदासाठी बंपर भरती, नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!!

Last Updated on December 12, 2022 by Taluka Post

Maharashtra: महाराष्ट्रात ग्रामसेवक पदासाठी बंपर भरती, नोकर भरतीचे वेळापत्रक जाहीर…!! ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

ग्रामसेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तसा निर्णय महाराष्ट्र शासनाणे जारी करण्यात आला असून, या भरतीसाठीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेअंतर्गत गट-‘क’मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. (वाहनचालक व गट- ‘ड’ संवर्गातील पदे वगळून). ही मान्यता मान्यता वित्त विभागाच्या निर्देशा नुसार 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू असेल. त्यानंतरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय 30 सप्टेंबर 2022 नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येईल.

जिल्हा परिषदेतील गट-‘क’मधील रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून भरली जाणार आहेत. त्यासाठी जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे:

▪️ 1 ते 7 फेब्रुवारी 2023 – पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.
▪️ 22 फेब्रुवारी 2023 – उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
▪️ 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 – अर्जाची छाननी

▪️ 2 ते 5 मार्च 2023 – पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
▪️ 6 ते 13 एप्रिल 2023 – पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिले जाईल.
▪️ 14 ते 30 एप्रिल 2023 – ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होईल.
▪️ 1 मे ते 31 मे 2023 – अंतिम निकाल व पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश

सारी जबाबदारी झेडपीची

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना या वेळापत्रकाचे पालन करावे लागेल. रिक्त पदे (80 टक्के मर्यादेपर्यंत), आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, परीक्षेसाठी कंपनी निवडणे, परीक्षेची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असणार आहे.

सविस्तर माहितीसाठी राज्य शासनाची अधिकृत वेबसाइट www.maharashtra.gov.in वर याचा अधिक तपशील उपलब्ध आहे. त्याचा सांकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे.

हेही वाचा: Purandar: अखेर पुरंदरच्या 13 शिक्षकांना दणका

Comments are closed.