Last Updated on December 25, 2022 by Jyoti S.
New Year 2023 : नवे वर्ष,नवे नियम,1जानेवारी 2023 पासून या क्षेत्रात होणार मोठे बदल!!
दर महिन्याच्या 1 तारखेला विविध क्षेत्रामध्ये मोठे-मोठे बदल होत असतात. नवा महिना नवे वर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी उरले आहेत. दर महिन्याप्रमाणे 1 जानेवारी 2023 मध्ये आर्थिक क्षेत्रात लक्षणीय बदल होणार आहेत, ज्याचा तुमच्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो..
कोणते बदल होणार..?
बँक लॉकरबाबत
रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार, लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी पुर्नपणे आता बँकेची असेल. त्यासाठी ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार देखील करावा लागेल.
क्रेडिट कार्डबाबत
एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंटचे नियम आता बदलणार आहेत. ग्राहकांना 31 डिसेंबरआधीच उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स वापरण्याचा सल्ला सरकारने आता दिला आहे.
हेही वाच: jio plan 2023 :जिओ’कडून ‘हॅप्पी न्यू इयर’ प्लॅन लाॅंच, ग्राहकांना नववर्षात मिळणार धमाकेदार सुविधा…
जीएसटी इनव्हॉइसिंगबाबत
New Year 2023 : सरकारने 2023 पासून ‘जीएसटी’च्या ई-इनव्हॉइसिंगसाठी 20 कोटींची मर्यादा 5 कोटींपर्यंत कमी केली आहे. ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय आता 5 कोटींहून जास्त आहे, त्यांना आता इलेक्ट्रॉनिक बिलं काढणे (जनरेट) खूप आवश्यक असेल.
एलपीजीच्या किंमतीबाबत
गेल्या काही काळात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत असल्याने आता नवीन वर्षात सरकारी तेल कंपन्या घरगुती गॅसच्या (एलपीजी) किमती कमी करू शकतात. वाहनांमधील ‘सीएनजी’, तसेच स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या ‘पीएनजी’ गॅसच्या किमतीही बदलू शकतात असा निर्णय झाला आहे.