पोलीस भरतीतील उमेदवार हैराण वेबसाईट हँग-सर्व्हर डाऊनमुळे

Last Updated on November 28, 2022 by Taluka Post

अडचणी तत्काळ दूर करण्याची धनंजय मुंडेंची मागणी

मुंबई : राज्यात सध्या विविध जिल्ह्यांत पोलीस शिपाई, चालक पदासाठी ऑनलाइन अर्ज भरले जात आहेत. परंतु सध्या वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात आणि अर्ज भरण्यास किमान १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.