Last Updated on December 12, 2022 by Taluka Post
Purandar: अखेर पुरंदरच्या 13 शिक्षकांना दणका जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडून दैनिक ‘पुण्यनगरी’च्या वृत्ताची दखल ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
सासवड(Purandar): प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया सुरू असून, यानिमित्ताने अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. तालुका स्तरावरील पडताळणी समितीने अनेक शिक्षकांना ‘आर्थिक मोबदला घेऊन चुकीची पडताळणी करून आपल्या सोयीस्कर अहवाल जिल्हा परिषदेकडे पात्र यादीत पाठविल्याचे उघड झाले आहे. पुरंदर तालुक्यात याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू असून, शिक्षण विभाग काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते..
दरम्यान, शुक्रवार दि. ९ डिसेंबरच्या दैनिक पुण्यनगरीमध्ये पुरंदर तालुक्यातील शिक्षण विभागाची अवस्था म्हणजे ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय! या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसारित करण्यात आले होते.यावृत्ताची दखल घेत जिल्हाशिक्षण विभागाने बोगस कागदपत्रांच्या आधारे सोयीस्कर केले होते. बदली करून फसवणूक करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील १३ शिक्षकांना दणका दिला आहे.
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी पुरंदर तालुक्यातील प्राथमिक दिव्यांग शिक्षकांची ऑनलाइन तपासणी करून यूडीआयडी कार्ड सादर करण्याची मागणी केली होती. परंतु अनेक शिक्षकांनी तसे प्रमाणपत्र सादर केलेले नव्हते. दिव्यांग आहे असे जाहीर करण्यासाठी १०० रुपयांच्या स्टम्प पेपरवरती लेखी देण्याची संपूर्ण राज्यात कोठेही तरतूद नसताना पुरंदरच्या बहाद्दूर शिक्षकांनी मात्र तसा प्रताप केल्याचे उघड करून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी स्टॅम्प ग्राह्य धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त तसेच पडताळणी समितीमध्ये आहे. सक्षम अधिकारी ऐवजी प्राथमिक शिक्षकांच्या नेमणुका केल्याने सुरेखा ढवळे यांनी आश्चर्य व्यक्त करून संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती..
पडताळणी विभागाने, तसेच गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत उगले यांनी कोणतीही कारवाई न करता संपूर्ण यादी ग्राह्य धरून जिल्हा शिक्षण विभागाकडे पाठवून दिली होती. यानंतर सुरेखा ढवळे यांनी दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधींशी संपर्क केल्यानंतर पुरंदरमधील शिक्षण विभागाच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभाराबाबत आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय! या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्त प्रसारित होताच पुरंदर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. तसेच जिल्हा शिक्षण विभाग खडबडून जागा झाला. आणि त्याच दिवशी पुरंदर तालुक्यातील संवर्ग एक आणि संवर्ग दोन मधील १३ शिक्षकांना जोरदार झटका दिला.
हेही वाचा: CNG Price Hike : सीएनजीच्या दरात 70 टक्क्यांची वाढ, CNG गाड्यांच्या वापरात घट