Monday, February 26

Ramesh Bais: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत? बघा देशात कोण झाल राज्यपाल

Last Updated on February 12, 2023 by Taluka Post

Ramesh Bais

Ramesh Bais: रमेश बैस यांनी झारखंड विधानसभेने दोन दिवसांपूर्वी पारित केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ राज्य सरकारला परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी विधेयक परत पाठवले. यावरून झारखंड सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष झाला होता.

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे वादात सापडलेले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. देशातील 13 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. यात भगतसिंग कोश्यारी यांचाही समावेश आहे. आता झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांचे झारखंड सरकारसोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. झारखंड विधानसभेने दोन दिवसांपूर्वी पारित केलेले ‘झारखंड वित्त विधेयक-2022’ त्यांनी राज्य सरकारला परत पाठवले. तिसऱ्यांदा त्यांनी बिल परत पाठवले. यावरून झारखंड सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष झाला होता.

कोण आहेत रमेश बैस Ramesh Bais

रमेश बैस हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. यापूर्वी 2019 मध्ये त्यांनी त्रिपुराचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते. ते सलग सात वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1999 पासून त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले. बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूर येथे झाला. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. ते मध्य प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते.

नगरसेवक- ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास

 • 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक
 • 1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य
 • 1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री
 • 1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला
 • छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. ते सात वेळा खासदार झाले.
 • मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
 • ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
 • सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
 • जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
 • जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय
 • 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल
 • 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली . महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे.

१३ राज्यपाल देशात बदलले

 1. रमेश बैस, राज्यपाल, महाराष्ट्र
 2. लेफ्टिनेंट जनरल कैवल्य त्रिविक्रम, राज्यपाल, अरुणाचल प्रदेश
 3. लक्ष्मण प्रसाद आचार्य, राज्यपाल, सिक्किम
 4. सीपी राधाकृष्णनन, राज्यपाल, झारखंड
 5. शिव प्रताप शुक्ला, राज्यपाल, हिमाचल प्रदेश
 6. गुलाबचंद कटारिया, राज्यपाल, आसम
 7. निवृत्त न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर, राज्यपाल, आंध्र प्रदेश
 8. बिस्वा भूषण हरिचंदन, राज्यपाल, छत्तीसगढ़
 9. अनुसुईया उइके, राज्यपाल, मणिपूर
 10. एल. गणेशन, राज्यपाल, नागालँड
 11. फागू चौहान, राज्यपाल, मेघालय
 12. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राज्यपाल, बिहार
 13. ब्रिगेडियर (रिटायर्ड) बीडी मिश्रा, उपराज्यपाल, लडाख

भगतसिंह यांना का बदलले

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकवेळा महापुरुषावर अपमानास्पद वक्तव्य केले होते. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाविकास आघाडीनेही राज्यपालांच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. यासह राज्यात राज्यपालांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या बरखास्तीची जोरदार मागणी केली.

हेही वाचा : Governor Bhagat Singh Koshyari: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर