Ration: रेशन ‘या’ महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..

Last Updated on December 24, 2022 by Jyoti S.

Ration: रेशन ‘या’ महिन्यापर्यंत मोफत मिळणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय..

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पुढील एका वर्षासाठी मोफत रेशन(Ration) देण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतलाच आहे. आता केंद्र सरकारने नवीन वर्षापूर्वीच नागरिकांना मोठी भेट सुद्धा दिली आहे.यामुळे लोकांना डिसेंबर 2023 पर्यंत आता मोफत रेशन मिळणार आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय:

▪️ कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने देशव्यापी लॉकडाऊनमुळे गरिबांना खाण्यासाठी मदत म्हणून एप्रिल 2020 मध्ये PMGKAY योजना लाँच करण्यात आली. या योजनेअंतर्गत आता 80 कोटी गरीब लोकांना दरमहा मोफत रेशन दिले जात होते.

▪️ राष्ट्रीय अन्न सुरक्षांतर्गत देण्यात येणाऱ्या या मोफत रेशनच्या(Ration) योजनेची मुदत चालू वर्षी 31 डिसेंबर 2022 रोजी संपत होती. आता त्याला केंद्र सरकारने एक वर्षाची मुदतवाढ पण दिली आहे. त्यामुळे पुढच्या डिसेंबरअखेर ही मोफत अन्नधान्याची योजना सुरू राहील.

हेही वाच: environment news: नाताळानंतर थंडी वाढणार, ‘या’ जिल्ह्यांतील सरासरी तापमान घसरणार

▪️ बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना दर महिन्याला मोफत रेशन दिले जाते. या मुदतवाढीमुळे आता पुन्हा 80 कोटी नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. तर केंद्र सरकारवर आता 2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजादेखील पडणार आहे.

? मंत्री पियुष गोयल यांनी आता माहीती दिली की, “राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता 80 कोटी लोकांना आता मोफत अन्नधान्य मिळणार आहे. आणि आता डिसेंबर 2023 पर्यंत लोकांना अन्नधान्य मिळवण्यासाठी 1 रुपयाही द्यावा लागणार नाही. कारण सरकार आणखी एक वर्ष सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करेल”, असं त्यांनी म्हंटल आहे.

Comments are closed.