संगमनेर(Sangamner): शेतात वाघ दिसतोय….

Last Updated on January 4, 2023 by Taluka Post

संगमनेर(Sangamner): तालुक्यात चोयांचे सत्र वाढत आहे. अनेक ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांना रात्र-रात्र जागून काढावी लागते. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणीही नागरिक करताना दिसतात. तसेच शहरानजीक असलेल्या काही गावांमध्ये रहिवासी भागात नागरिकांना दिवसाही बिबट्यांचे दर्शन झाले. परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

दिवसाही घराबाहेर पडण्याची भीती परिसरातील नागरिकांना वाटते आहे. वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी होत असून बिबट्या परिसरात दिसल्याचे व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओत फक्त उसाचे शेत दाखविले जात आहे, तर काही व्हिडीओ श्वानांचे आवाज ऐकायला येत आहेत. काही व्हिडीओत वाघ दिसतोय वाघ, असे लोक बोलत आहेत. मात्र, हे व्हिडीओ पाहून नागरिकांना रात्री अपरात्री एकटे फिरण्याची भीती बसली आहे. त्यात पुन्हा चोरटेही सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बिबट्यांसोबत चोरट्यांच्या भीतीने नागरिक त्रस्त आहेत.

हेही वाचा: Ahmednagar Crime: देव तरी कुठे सुरक्षित, दीड लाखांचा मुद्देमाल लंपास