नांदगावी आरपीआयच्या वतीने तहसील कार्यालयावर उपोषण

Last Updated on November 25, 2022 by Taluka Post

नांदगाव तहसील कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यात येणाऱ्या अडीअडचणी व नागरिकांची होणारी छळवणूक, तसेच तहसील कार्यालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. २४) नाशिक जिल्हा आर.पी.आय.च्या वतीने तहसील कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनाच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दिव्यांग व्यक्तींच्या रखडलेल्या शिधापत्रिका, अंत्योदय शिधापत्रिका त्वरित ऑनलाइन करण्यात याव्यात, संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी, दिव्यांग पेन्शन, कुटुंब अर्थसाहाय्य प्रकरण मंजूर करण्यात यावे, तहसील कार्यालय ऑनलाइन सुविधा त्वरित सुरू करण्यात याव्यात, तालुक्यातील जनतेस शिधापत्रिकेपासून वंचित न ठेवता प्रत्येकास शिधापत्रिका मिळावी, गिरणानगर ग्रामपंचायत हद्दीतील स्वस्त धान्य दुकानावर कारवाई करावी, मनमाड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी आदी मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर उपोषण करण्यात आले.

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, राजेंद्र अहिरे, दिनकर धीवर, देविदास मोरे, महावीर जाधव आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आरपीआयने केलेल्या मागण्या व समस्यांबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्या येईल, असे आश्वासन यावेळी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. हेही वाचा: आजचे सोयाबिन बाजार भाव (दि.25/11/2022)

नांदगाव तालुक्यातील अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा इथे क्लीक करा