Todays weather : पुढील 3 दिवस या 10 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Last Updated on March 27, 2023 by Jyoti S.

Todays weather

Todays weather : भारतीय हवामान खात्याने आता पुढील तीन दिवस देशातील एकुण 10 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा सांगितला आहे. यासोबतच काही भागात उष्मा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


Todays weather : गेल्या काही दिवसांपासून आता देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार अवकाळी पाऊस पडतच आहे. यासोबतच येत्या ३ दिवसांत देशातील १० राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये यावेळी पाऊस पडत आहे. तसेच काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अन्य राज्यांत जोरदार मुसळधार पाऊस झाला.

हेही वाचा: Punjab Dakh weather update : एप्रिल महिन्यासाठी पंजाब डख हवामानाचा अंदाज! ‘या’ तारखेला मुसळधार पाऊस पडेल


या अश्या अवकाळी पावसामुळे आता देशातील खूप साऱ्या शेतकऱ्यांचे(Farmers) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच रब्बी पिकांची काढणी सुरू असतानाच ह्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे जोरदार नुकसान झाले आहे. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिके लवकरात लवकर काढावी लागणार आहेत.

देशातील अनेक राज्यांमध्ये हवामान बदल दिसून येत आहेत. कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे उष्मा वाढतच चालली आहे. अजूनही काही भागात पाऊस सुरू आहे.

दिल्लीत आजच्या तापमानात किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 30 अंश नोंदवले गेले. यासोबतच दिवसभर आकाश ढगाळ राहिले. तथापि, तालुका पोस्ट हवामान अंदाजानुसार उद्या म्हणजेच 27 मार्च रोजी जोरदार पाऊस पडेल. यासोबतच दिल्लीतही तापमानात घट होत आहे.

हेही वाचा: Soybean Price Will Increase : सोयाबीन उत्पादकांसाठी लवकरच आनंदाची बातमी; दरात ‘या’ एका कारणामुळे होणार उच्च वाढ, पहा तज्ज्ञांचा अंदाज काय

तालुका पोस्ट हवामान अंदाजानुसार, 23 मार्चपासून सक्रिय झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.


तसेच, पश्चिम राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये देखील पावसाचा जोर कमी होणार आहे . उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे.

पाऊस कुठे आणि किती पडेल पहा

हवामान खात्यानुसार, आता आज म्हणजेच 27 मार्च आणि 31 मार्च रोजी उत्तर भारतातील राज्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

अरुणाचल प्रदेश व्यतिरिक्त आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.