Saturday, March 2

HSC Exam paper leak : बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी खळबळजनक माहिती; केवळ गणितच नाही तर या दोन विषयांचे पेपर हि फुटले

Last Updated on March 15, 2023 by Jyoti S.

HSC Exam paper leak

HSC पेपर लीक(HSC Exam paper leak) : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात केवळ गणितच नाही तर इतर दोन विषयांचे पेपरही फुटल्याचे निष्पन्न झाले आहे.

आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा


HSC Exam paper leak : बारावीच्या पेपरफुटीप्रकरणी खळबळजनक माहिती; केवळ गणितच नाही तर या दोन विषयांचे पेपर फुटले

बारावीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाच्या बारावी परीक्षेच्या पेपरफुटीच्या तपासात समोर आली आहे. पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाकडून कडक पावले उचलली जात असतानाच गणितासह तीन पेपर फुटल्याची बाब तपासात समोर आली आहे. बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. या तपासातून ही सर्व माहिती समोर आलेली आहे.

कुठल्या शाळेमध्ये हे प्रकरण झाले पहा इथे क्लिक करून


एचएससी बोर्डाच्या गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा तपास करत आहे. गणिताव्यतिरिक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपरही फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी सांगितले की, गणिताव्यतिरिक्त आणखी दोन पेपर फुटण्याचे पुरावे सापडले आहेत.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्चला गणिताचा पेपर सोडण्यापूर्वी, फिजिक्सचा पेपर 27 फेब्रुवारीला आणि रसायनशास्त्राचा पेपर 1 मार्चला निघाला होता. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक तास अगोदर व्हॉट्सअॅपद्वारे शेअर करण्यात आल्याचे पुरावे आढळून आले आहेत.

हेही वाचा: nuksan bharpai : अवकाळी पावसामुळे राज्यातील या आठ जिल्ह्यांतील १३ हजार ७२९ हेक्टर पिकांच्या नुकसान भरपाई जाहीर येथे पहा लगेच पात्र जिल्ह्याची यादी

गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदनगर येथील मातोश्री भागुबाई भांबरा कनिष्ठ कृषी व विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन कर्मचारी आणि शिक्षकांचे मोबाईल फोन गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. त्यांच्या जप्त केलेल्या मोबाईलचा व्हॉट्सअॅप डेटा प्राप्त झाला आहे. गणिताव्यतिरिक्त भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचाही पेपर फुटला आहे.

हेही वाचा: HSC Exam Paper 2023 : बारावीच्या पहिल्या दिवशी पेपरमध्ये मोठी चूक..! या विद्यार्थ्यांना अतिरिक्त 6 गुण मिळतील


Comments are closed.