
Last Updated on November 20, 2022 by Taluka Post
मुंबई : मंत्रालयात (Mantralay) एका आंदोलन कार्यकर्त्यांने पुढे मागे न बघता संरक्षण जाळीवर उडी घेतल्यामुळे मंत्रालयातील सुरक्षा रक्षकांचा चांगलाचं गोंधळ उडाला आहे. विशेषतह म्हणजे संरक्षण जाळीवर उडी घेतल्यानंतर सुद्धा तो कार्यकर्ता घोषणाच देत होता. हे आपल्याला व्हिडीओ (Video) स्पष्ट दिसत आहेत. मंत्रालयात विविध कामानिमित्ताणें आलेले लोक सुद्धा कार्यकर्त्याचं आंदोलन पाहत होते.त्याने दुपारच्या सुमारास उडी घेतली त्या कार्यकर्त्याचा डोक्याला दुखापत झाल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे. तो आंदोलनकर्ता (Agitator) खूपच तरुण आहे आणि त्याच्या पाठीवर एक बॅग आहे.
आंदोलन कार्यकर्त्यांचं नाव अजूनही कुणालाच समजलेलं नाही. त्याचबरोबर तो कोणत्या कामासाठी आलेला होता हे सुद्धा समजलेलं नाही. फक्त त्याने हे कृत्य संतापून केला आहे असा तो बोलतोय. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयात अशा पद्धतीची कोणतीही घटना होऊ नये,म्हणून त्यासाठी त्यांनी जाळीसुद्धा लावलेली आहे.
Comments are closed.