Tuesday, February 27

Mumbai Crime News: मुंबईत बॉम्बस्फोटाची शक्यता, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

Last Updated on December 31, 2023 by Jyoti Shinde

Mumbai Crime News

मुंबई : शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा फोन आला. पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून धमकीच्या कॉल्समध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याचं त्या व्यक्तीनं म्हटलं आहे. एक वाक्य बोलून त्याने लगेच फोन ठेवला. यानंतर खळबळ उडाली आहे.Mumbai Crime News

काल (शनिवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास फोन आला. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक तपासात फोनचे लोकेशन जेबी नगर एअरपोर्ट रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स(JB Nagar Airport Residency Complex) असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.Mumbai Crime News

हेही वाचा: Ayodhya Ram Mandir Do Celebrate Diwali On January 22: सगळीकडे 22 जानेवारीला दिवाळी साजरी करा; प्रत्येक घराघरात ‘रामज्योती’ पेटवावी; पंतप्रधान मोदींचे आवाहन