Tuesday, February 27

Mumbai metro: मेट्रो ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिलांसाठी राखीव जागा!

Last Updated on February 12, 2024 by Jyoti Shinde

Mumbai metro

नाशिक : ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी राखीव जागांची संख्या वाढणार आहे

मेट्रो ट्रेनने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मेट्रोतील दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाखांवर पोहोचल्याने प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागत आहे.(Mumbai metro)

त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह गरोदर महिलांना प्रवासादरम्यान प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागांची संख्या वाढवून गर्भवती महिलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

एमएमआरडीए सध्या अंधेरी-गुंदवली दरम्यान प्रत्येकी सहा डब्यांच्या 22 मेट्रो ट्रेन चालवते. वाहतूक कोंडी न होता गारगरपर्यंत प्रवास करता येत असल्याने प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. मात्र सध्या ६ डब्यांपैकी एक डबा महिलांसाठी राखीव आहे, तर उर्वरित पाच डब्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जागा राखीव असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत.

हेही वाचा : Isro To Launch New Hi Fi Satellite:इस्रो या तारखेला प्रक्षेपित करणार अत्याधुनिक उपग्रह INSAT-3DS, पाहा काय होणार फायदा?

त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना बसण्याची जागा नसल्यामुळे अनेकदा उभे राहून प्रवास करावा लागतो. एमएमआरडीएचे आयुक्त डॉ.संजय मुखर्जी यांनी नुकताच मेट्रो ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा आणि गर्भवती महिलांसाठी राखीव जागा वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.(Mumbai metro)

प्रवाशांना चांगली सेवा द्या

मुंबईकरांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी एमएमआरडीए विविध टप्प्यांत प्रयत्न करत आहे. याशिवाय भविष्यात मेट्रो गाड्यांची संख्या वाढवण्याचीही एमएमआरडीएची योजना आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी वेग मिळू शकणार आहे.