Mumbai news: नॉन व्हेज खाणाऱ्यानो सावधान! एकदा ही बातमी वाचा,अन ठरवा…

Last Updated on August 16, 2023 by Jyoti Shinde

Mumbai news

नाशिक : वांद्रे येथील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये चिकन आणि मटणाच्या डिशेसमध्ये उंदराचे मांस आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर वांद्रे पोलिस ठाण्यामध्ये याप्रकरनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 14 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट शिकेरा (वय 40 वर्षे) आणि संबंधित रेस्टॉरंटचा शेफ तसेच चिकनचा पुरवठादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी अनुराग सिंग (वय 40 वर्षे) हा मित्र अमितसोबत वांद्रे पश्चिम येथील पाली नाका येथील एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेला होता. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटण थाळीची ऑर्डर दिली. जेवताना त्याची नजर एका मांसाच्या तुकड्यावर पडली जी वेगळी दिसत होती. जवळून पाहणी केली असता, ते उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे आढळले.Mumbai news

हेही वाचा : Shimla landslide on shiv temple:श्रावण सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या शिवभक्तांवर काळाचा घाला! मंदिरावर दरड कोसळून ५ ठार,तर अनेक..

जेवणादरम्यान अनुराग सिंग आणि त्याचा मित्र अमित यांना चिकन डिशमध्ये काहीतरी गडबड झाल्याचे लक्षात आले. यानंतर मी ताटात पाहिलं तर ताटात एक वेगळाच मांसाचा तुकडा दिसला. जवळून पाहणी केली असता, तो मांसाचा तुकडा उंदराचा असल्याचे पाहून अनुराग सिंग आणि अमित यांना धक्काच बसला.

यानंतर अनुराग सिंह यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम २७२, ३३६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास चालू आहे.Mumbai news 

टीप : कृपया नॉन व्हेज खाताना आधी त्या डिश ची व्यवस्तीत रित्या पारख करून घ्या मगच खा.

हेही वाचा: Raksha Bandhan Kadhi Ahe: रक्षाबंधन कधी आहे? राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या