इतिहासातील कोणत्याच व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग होऊ नये : चव्हाण

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

मुंबई : इतिहासातील कोणत्याच व्यक्तीचा राजकारणासाठी उपयोग होऊ नये, अशी अपेक्षा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप आणि मनसेने आंदोलन केले. तसेच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे
चव्हाण म्हणाले, कोणतीही टोकाची बाजू न घेता ऐतिहासिक व्यक्तींचे योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे. इतिहासाचे अभ्यासक जसे एखाद्या ऐतिहासिक घटनेकडे पाहतात, तसे सामान्य माणूस पाहत नाही. सामान्य माणूस आपल्याला सोयीस्कर वाटते तेच पाहतो आणि त्यावरून आपले मत बनवतो. इतिहासातील कोणत्याही व्यक्तीकडे पाहिले तर त्याच्यात काहीतरी गुण-दोष असतातच. या गुण-दोषांचे योग्य मूल्यमापन झाले पाहिजे. हेही वाचा :Mantralaya: मंत्रालयात ‘स्पायडरमॅन’ पद्धतीने तरुणाचे आंदोलन