Last Updated on December 12, 2022 by Jyoti S.
Recording:अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर आहे. याच कारणामुळे गुगलने काही काळापूर्वी थर्ड पार्टी ऍप्सही बंद केले होते, म्हणजेच थर्ड पार्टी ऍप्सवरून कॉल रेकॉर्डिंग अजिबात करता येत नाही.
मुंबई 11 डिसेंबर : आपण बऱ्याचदा फोन रेकॉर्ड करुन समोरच्याचं बोलणं रेकॉर्ड (Recording)करत असतो . अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर आहेच . आणि याच कारणामुळे गुगलने काही काळापूर्वी थर्ड पार्टी ऍप्सही बंद केले होते, परंतु थर्ड पार्टी ऍप्सवरून कॉल रेकॉर्डिंग करता येत नाही. यासाठी, खरंतर फोनमध्येच इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंगची सुविधा होती, परंतु, जर तुम्ही इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर चालू केले तर समोरच्या व्यक्तीला त्याची माहिती मिळत असते.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
अनेक वेळा असंही होतं की समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असते आणि तुम्हाला याची माहिती सुद्धा नसते. पण आता जर असं असं असेल तर तो माणूस ओळखला जाऊ शकतो. यासाठी आता तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावीच लागेल.Snapchat चे नवीन AR वैशिष्ट्य निर्मात्यांना पैसे कमविण्याची संधी देईल
तुमचा फोन कॉल रेकॉर्ड(Recording) होत आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची बिलकुल गरज नाही. आजकाल, नवीन फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची घोषणा ऐकू येते, परंतु जर कॉल रेकॉर्डिंग जुन्या किंवा फीचर फोनवरून होत असेल तर मोठी समस्या येते कारण त्यामध्ये असा आवाज ऐकू येत नाही आणि अशा परिस्थिती मध्ये तुम्हाला इतर गोष्टींचा वापर करावा लागेल.
कॉलवर बोलत असताना फोनच्या बीपच्या आवाजाकडे लक्ष द्या.कॉल चालू असताना बीप-बीपचा आवाज येत असेल तर लगेच समजून जा तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.तसेच कॉल रिसिव्ह केल्यानंतर हि बराच वेळ बीपचा आवाज येत असेल तरीपन समजा कि तूमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.
कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल टॅपिंग म्हणजे काय?

कॉल रेकॉर्डिंग(Recording) आणि कॉल टॅपिंगमधील बरयाच लोकांना फरक माहित नाही. जेव्हा तिसरी व्यक्ती तुमचे संभाषण हे रेकॉर्ड करत असते तेव्हा त्याला कॉल टॅपिंग म्हणतात. हे रेकॉर्डिंग चे काम टेलिकॉम कंपन्यांच्या माध्यमातूनही होऊ शकते. न्यायालयाची परवानगी घेतल्यानंतरच तपास यंत्रणा ह्या कॉल टॅपिंग करू शकतात.
पण कॉल रेकॉर्डिंगमध्ये समोरील व्यक्ती किंवा ती दुसरी व्यक्ती या तिसरी तुमचे कॉल रेकॉर्डिंग करत असेल तर ते कायद्याने खूपच चुकीचे आहे.
कॉल टॅपिंगमध्ये कॉल करणाऱ्यांना बिलकुल कळत नाही, पण काही गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या, त्यानंतर कॉल टॅप होत आहे की नाही हे समजू शकते.
टॅपिंगचे लक्षण मानले जाऊ शकते, परंतु केवळ कॉल ड्रॉपमुळे कॉल टॅप होत आहे असे बिलकुल म्हणता येणार नाही.