
Last Updated on March 10, 2023 by Jyoti S.
Viral video Mumbai
थोडं पण महत्वाचं
Viral video Mumbai : अवकाळी पावसाने राज्यभर कहर केला आहे. या प्रतिकूल हवामानामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यासोबतच कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे. मात्र शासनाकडून हवी तशी मदत मिळत नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराज आज असते तर शेतकऱ्यांची अवस्था फार वेगळी नसती का? त्यांनी नेहमी बळीराजाच्या हिताचाच विचार केला. (Viral video Mumbai)
आपल्या तरुण पिढीने महाराजांचे विचार आचरणात आणणे अत्यंत गरजेचे आहे. अनेक ठिकाणी तरुणाई चुकीच्या मार्गावर जाताना दिसत आहे. काही तरुण शिक्षणाअभावी चुकीच्या मार्गावर जातात. तसेच काही तरुण तासनतास गेम खेळण्यात आणि फोनवर गप्पा मारण्यात घालवतात. मात्र अशा तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे कार्यही वाचावे.
व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आतापर्यंत मराठी सिनेमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सुंदर टप्पा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही मंडळी तर गाणी आणि पोवाड्यांद्वारे महाराजांची कीर्ती जगभर पसरवत आहेत. यामध्ये काही तरुण महाराजांच्या गाण्यांवर नाचताना दिसत आहेत.
हेही वाचा: Poultry Business : महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा! उत्पादन वाढवण्यासाठी सरकार अनुदान देणार का?
हा व्हिडिओ मुंबईतील नेहमीच गजबजलेल्या मरीन लाइन्समध्ये शूट करण्यात आला आहे. “राज आलें राजन आलें जिंकुनिया जगभरी…” या गाण्यावर तरुणांनी मनसोक्त नाचले. आकाश साळवीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हेही वाचा: खूशखबर! नाशिक- बेळगाव विमानसेवेचे बुकिंग पुन्हा सुरू
मरीन लाईन्सवर नेहमीच नागरिकांची ये-जा असते. समुद्राच्या लाटा पाहून आपल्या मनात चाललेला संघर्ष शांत तिथं येऊन शांत होतोत या ठिकाणी या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य केले. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडिओचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.