Last Updated on December 31, 2022 by Jyoti S.
Eknath Shinde: हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले
नागपूर शेतकरी चांगल्या गाडीतून फिरला पाहिजे, समृद्धी महामार्गामुळे तो आता फिरत आहे. शेतकऱ्यांनी हेलिकॉप्टरमधून फिरले पाहिजे, त्यासाठी तालुकास्तरावर हेलिपॅड उभारत आहे. रुग्णांना एअरलिफ्ट करता येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.
विरोधकांच्या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा पाढाच वाचला. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजीही केली.
महापुरुषांचा सन्मान करण्यास कुणाकडून ‘शिकण्याची गरज नसल्याचे सांगत छत्रपतीच्या वारसदारांकडे वंशज असल्याचे पुरावे कुणी मागितले? संभाजीराजेंकडे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी प्रतिज्ञापत्र कुणी मागितले? छत्रपतीना जाणता राजा म्हणू नका, असे कुणी सांगितले? – एकनाथ शिंदे,(Eknath Shinde) मुख्यमंत्री.
हेही वाचा: Robot-2023 : आता खा रोबोटच्या हातचे अन्न !!