Nagpur Crime : सरकारी धान्य खाजगी गोदामात उतरवले जात होते, मग अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आले आणि…

Nagpur Crime

नागपुरात(Nagpur Crime) गेल्या अनेक दिवसांपासून शासकीय धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती. त्याअंतर्गत आज पोलिसांनी छापा टाकला.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


नागपूर(Nagpur Crime) नागपुरात रेशन घोटाळा समोर आला आहे. रेशनच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आला आहे. गरिबांना रेशनमध्ये दिले जाणारे धान्य अनधिकृत खासगी गोदामात उतरवण्यात आले. दरम्यान, अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे पोहोचून चोरट्याला रंगेहाथ पकडले.

हेही वाचा : Gharpoch valu yojna 2023 : घर बांधणाऱ्यांसाठी खुशखबर..! 1 ब्रास वाळू अवघ्या 600 रुपयांना मिळणार, ‘या’ दिवशी लागू होणार, पाहा अटी व शर्ती..

खासगी गोदामांमध्ये पन्नास क्विंटल धान्य उतरवण्यात आले. हे धान्य कुठून आले आणि कोणाला विकले जाणार होते, याचा तपास सुरू आहे. यामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणाची एकदम कसून चौकशी केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून धान्याचा काळाबाजार सुरू होता


गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात शासकीय रेशन धान्याचा काळाबाजार(Nagpur Crime) सुरू असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाला मिळाली होती. सोबतच ठाकरे गटाच्या युवा सेना कार्यकर्त्यांनीही यासंदर्भात अन्न प्रशासन विभागाला कळवले होते. मात्र आरोपी पकडला गेला नाही.

माहितीच्या आधारे अन्न पुरवठा विभागाने छापा टाकला

आज गड्डीगोदाम परिसरातील एका गोदामात शासकीय धान्य उतरवले जात असल्याची गुप्त माहिती अन्नधान्य वितरण विभागाला मिळाली. गोदाम खाजगी आहे. बोर्ड नाही. अन्नधान्य वितरण विभागाने घटनास्थळ गाठून त्यावर कारवाई केली असता, त्या गोदामात सुमारे 50 क्विंटल धान्य आढळून आले. त्या धान्यावर सरकारचा शिक्का आहे.

तसेच ट्रकचालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार पंधरा क्विंटल धान्य त्या ठिकाणी पोहोचवायचे होते. ही कारवाई करण्यात आली असून आता पुढील कार्यवाही अन्न प्रशासन विभागाकडून करण्यात येत आहे

हेही वाचा: PAN Card Link to Aadhaar Card : आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याच्या नियमांमध्ये बदल