Last Updated on January 6, 2023 by Jyoti S.
Own home automation: कमांड ऐकणाऱ्या ॲलेक्साची आता गरज नाही; नागपूरचे अॅप करेल मदत
Table of Contents
नागपूर : सेव्ह केलेल्या कमांडनुसार किंवा तोंडाने सांगितल्यानंतर विजेची उपकरणे चालू-बंद करणारे ॲलेक्सा उपकरण जगभरात प्रसिद्ध आहे. आता नागपुरातील दोन हरहुन्नरी विद्यार्थ्यांनी ॲलेक्साच्या तोडीचे अॅप तयार केले आहे. हे अॅप वापरून आपल्याला बसल्या जाग्यावरून विजेची उपकरणे चालू-बंद करता येतात. त्यामुळे येणाऱ्या काळात अॅलेक्साची गरज संपल्यास नवल होणार नाही.
शांतीनगर येथील ग्रेट ब्रिटेन(Great Britain) हायस्कूलमधील स्वाती तिवारी व आनंद रामटेके या विद्यार्थ्यांनी शिक्षक प्रवीण नागपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अॅप तयार केले आहे.
ओन होम ऑटोमेशन ….
अॅपला ओन होम ऑटोमेशन(Own home automation) नाव देण्यात आले आहे. चिल्ड्रेन सायन्स काँग्रेसमध्ये हा प्रयोग सादर करण्यात आला आहे. या अॅपला तोंडाने सांगून, बटन दाबून व मोबाइल हलवून विजेची उपकरणे चालू-बंद करता येतात. ही यंत्रणा घरात संचालित करण्याचा खर्च केवळ ७०० रुपये आहे.
स्मार्ट लाइट स्वीच
■ विद्यार्थ्यांनी स्मार्ट लाइट स्वीचही तयार केले आहे. हे स्वीच लावल्यानंतर दार उघडताच लाइट सुरु होतो व दार बंद करताच लाइट बंद होतो. या यंत्रणेत रिले, मॅग्नेट, स्वीच, रिचार्जेबल बॅटरी व वायरचा उपयोग करण्यात आला आहे.
हेही वाच: jio plan 2023 :जिओ’कडून ‘हॅप्पी न्यू इयर’ प्लॅन लाॅंच, ग्राहकांना नववर्षात मिळणार धमाकेदार सुविधा…
■ स्मार्ट लाइट स्वीच लावण्याचा खर्च केवळ १५ रुपये आहे. देखभाल खर्च नगण्य आहे. विजेच्या संपर्कात यावे लागत नसल्यामुळे दोन्ही यंत्रणा १०० टक्के सुरक्षित आहेत.
■ हा मेक इन इंडियाचे स्वप्न पूर्ण करणारा प्रयोग असल्याचे मत नागपुरे यांनी तालुकपोस्ट सोबत बोलताना व्यक्त केले.