
Last Updated on December 4, 2022 by Taluka Post
नाशिकरोड वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी चालकावर गुरुवारपासून कारवाई सुरू केली आहे. नाशिकरोड येथे सकाळी दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत ११३ वाहनचालकांकडून १० हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
नाशिकरोड परिसरातील बिटको कॉलेजसमोर व बिटको चौक येथील वाहतूक सिग्नलजवळ शहर वाहतूक शाखेचे नाशिकरोड विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. उपनिरीक्षक पाटील, हवालदार प्रकाश आरोटे, जाधव, थोरात, सांगळे आदींनी ही मोहीम राबविली. ११३ वाहन चालकांकडून सुमारे दहा हजार पाचशे(10,500) रुपये दंड वसूल करण्यात आला. काही वाहन चालकांनी मर्यादित मुदतीत दंड न भरल्यास त्यांच्यावर कोर्टात खटला दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेचा अनेक वाहनचालकांनी धसका घेतला.
सकाळपासूनच नाशिकरोड परिसरात अनेक वाहन चालक हेल्मेट परिधान करताना दिसून आले. तर अनेक वाहनधारक वाहतूक पोलिसांची कारवाई बघून रस्त्यातच गाड्या थांबवून उलट दिशेने पुन्हा निघून जात होते. तर दंड वसुलीच्या ठिकाणी वाहन चालक व पोलिस यांच्यात किरकोळ वाद झाल्याच्या घटनाही घडल्या,