
Last Updated on November 28, 2022 by Jyoti S.
आज होणार समारोप
नाशिक : सुटीची संधी साधून गृह शोधाची मोहीम पूर्ण करण्यास सोयीचे व्हावे यासाठी नाशिकमधील – नागरिकांनी रविवारी (दि. 27 ) मोठ्या संख्येने क्रेडाई शेल्टर गृहप्रदर्शन बघण्यासाठी गर्दी केली. अतिभव्य आंतरराष्ट्रीय स्तरास साजेसे असे नीटनेटके आयोजन, आकर्षक आणि नावीन्यपूर्ण स्टॉल, पार्किंगची प्रशस्त सोय, विविध आकर्षक ऑफर्सची रेलचेल यामुळे हे गृहप्रदर्शन आगळे वेगळे ठरत आहे. गेल्या चार दिवसांत सुमारे 40 हजार नागरिकांनी शेल्टरला भेट दिली असून, 250 हून अधिक सदनिकांचे बुकिंग झाले आहे. सोमवारी (दि. 28) या शेल्टर प्रदर्शनाचा समारोप होत आहे.
कोणत्याही शहराच्या निर्मितीमध्ये तेथील बांधकाम व्यावसायिकांची भूमिका मोलाची असते. नाशिक शहराचे लँडस्केप, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग यामध्ये 35 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या क्रेडाईची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष रवी महाजन यांनी रविवारी सांगितले. या गृहप्रदर्शनात गरिबांना परवडणाऱ्या व श्रीमंतांना आवडणाऱ्या घरांच्या व्हरायटीज बघायला मिळत आहेत. अगदी नऊ लाख रुपयांच्या प्लॉटपासून पाच कोटी रुपयांपर्यंतचे फ्लॅट्स येथे उपलब्ध आहेत. मोठ्या शहरांसारख्या टाउनशिपची सुरुवात नाशिकमध्ये या स्पर्धेत निवड काही वर्षांपूर्वी झाली आहे. मुंबई आणि पुणे यांच्या त्याच विचारांच्या नाट तुलनेत येथील रियल इस्टेटचे दर तुलनात्मकदृष्ट्या देण्याचा विचार अ खूपच कमी असल्याने नाशिकमध्ये रियल इस्टेटमध्ये आरोप आहे. केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये निश्चितच फायदेशीर ठरेल, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
रविवारी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये किरण पिंगळे, दीपक सूर्यवंशी, अभय काळे, अभिजीत अटल, अजित शिर्के यांना पारितोषिके जाहीर झाली. समारोप कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री भारती पवार, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर, आ. सरोज आहिरे, आ. राहुल ढिकले, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे उपस्थित राहणार आहेत.