
Last Updated on November 25, 2022 by Taluka Post
हेल्मेटअभावी शहर, परिसरात 83 दुचाकीस्वारांचा बळी
नाशिक : हेल्मेट अभावी अपघातात होणारी प्राणहानी व जखमींचे प्रमाण रोखण्यासाठी शहर पोलिसांनी पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचे अस्त्र उपसले असून, दि. 1 डिसेंबरपासून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांनी प्रवासात नियमित हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
यंदा शहर परिसरात झालेल्या अपघातांमध्ये विना हेल्मेट 83 दुचाकीस्वारांचा बळी गेला आहे; तर 261 वाहनधारक गंभीर जखमी झाले आहेत. डोक्याला मार लागल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे अपघाताच्या कारणाच्या विश्लेषणात स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, हे पाऊल उचलण्यात आले आहे.आजवर जेव्हा हेल्मेटसक्ती ‘झाली, त्या त्या वेळी प्राणांतिक अपघात व जखमींच्या संख्येत घट झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हेल्मेट न घालता वाहन चालविल्यास 500 रुपये दंडाची तरतूद आहे.
महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिसांनी प्रायोगिक तत्त्वावर गस्त घालणे सुरू केले आहे. त्यामुळे अपघातात बऱ्यापैकी .घट झाल्याचा दावा केला जात आहे. शहरातील सर्व दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरवासीय कायदा सुव्यवस्थेचे स्वयंस्फूतीर्ने पालन करतात. त्यामुळे सक्ती करण्याची आवश्यकता पडत नाही. तथापि दुचाकीस्वारांचे अपघात, त्यातील मृत्यू व जखमी लक्षात घेता नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात पोलिसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते, असे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी म्हटले आहे. हेही वाचा: जानोरीत बायोडिझेल निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त