Last Updated on December 13, 2022 by Jyoti S.
A dutiful citizen: डॉ. शेकटकर डॉ. मुंजे जयंतीनिमित्त व्याख्यानमालेला सुरवात
आजचे व्याख्यान
वक्ते : लेफ्टनंट जनरल (निवृत्त) संजय कुलकर्णी. विषय : उत्तरीय सीमेच्या भागातून उद्भवणारी धोके वेळ : मंगळवार (ता. १३) सायंकाळी पाच वाजता ठिकाण : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोड. रावसाहेब थोरात हॉल : डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेत बोलताना लेफ्टनंट (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर.(A dutiful citizen)
नाशिक, ता. १२ सुदृढ राष्ट्रासाठी तेथील लष्कर, संरक्षण क्षमता, विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेली आघाडी तर महत्त्वाची आहे. परंतु केवळ या बाबी राष्ट्राला घडवू शकत नाही. समृद्ध राष्ट्र(A dutiful citizen) घडविण्यासाठी येथील नागरिक कर्तव्यदक्ष असणे आवश्यक असते, असे प्रतिपादन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. डी. बी. शेकटकर यांनी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संस्थेतर्फे डॉ. बा. शि. मुंजे यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी ते बोलत होते. ‘राष्ट्रीयत्व’ असा व्याख्यानाचा विषय होता.
आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आयोजन संस्थेचे नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे उपस्थित होते. डॉ. शेकटकर म्हणाले, की राष्ट्र ही संकल्पना केवळ भौगोलिक भागापुरता मर्यादित नसून, तर प्रदेशाची परंपरा, संस्कृती, शिक्षण, सामाजिक प्रतिमेतून राष्ट्र निर्माती होते. राष्ट्र निर्माणात चारित्र्य महत्त्वाचे ठरते. चारित्र्यवान नागरिक घडविण्यासाठी चांगले शिक्षण असणे आवश्यक आहे. चांगले शिक्षण देण्यासाठी चांगले शिक्षण व विद्यापीठ असावे लागतात. राष्ट्रीयत्वाचे पतन होते तेव्हा संबंधित राष्ट्राचेदेखील पतन होत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांत आपल्या राष्ट्राविषयी अभिमान असणे अत्यंत आवश्यक ठरते.Rooftop Solar Scheme : रूफटॉप सौर योजनेला 2026 सालापर्यंत मुदतवाढ
अध्यक्षीय मनोगतात अँड. ठाकरे म्हणाले, की डॉ. मुंजे यांनी समाजासाठी केलेले काम विचारात घेण्यासारखे आहे. (A dutiful citizen)मुलींनीदेखील सैनिकी शिक्षण घ्यावे, असा त्यांचा आग्रह होता. आज अनेक वर्षांनंतर मुलींचा सर्वच क्षेत्रात वावर वाढत असताना, त्यांचा दुरदृष्टीकोन सिद्ध होतो. कार्यक्रमाच्या सुरवातीस श्रीमती दलाल यांनी पद्य म्हटले. मेजर विक्रांत कावळे यांनी सूत्रसंचालन केले. जगभरातील विविध देशांमध्ये उच्चपदांवर भारतीय नागरिक, भारतीय मुळाचे व्यक्ती अधिराज्य गाजवत आहेत. याउलट अनेक देशांमध्ये पाकिस्तानसारख्या देशाच्या नागरिकांकडे दहशतवादी म्हणून बघितले जाते. दहशतवादी जन्माला येत नसून, तेथील व्यवस्था दहशतवादाला पोसते. म्हणूनव अशा राष्ट्रांची नाचक्की होत असल्याचे मत डॉ. शेकटकर यांनी व्यक्त केले.