Tuesday, February 27

A gathering for my community: २१ जानेवारी २०२४ रोजी नाशिक येथे “एक मेळावा माझ्या समाजासाठी” ह्या कार्यक्रमाला ९६ कुळी मराठा शेतकरी,नोकरदार इ.उपस्तित राहावे.

Last Updated on January 3, 2024 by Jyoti Shinde

A gathering for my community

समाजबांधवांनो ,
जय शिवराय .🙏🚩

Nashik: रविवार दि. २१ जानेवारी २०२४ रोजी हरीकृपा मंगल कार्यालय लॉन्स पाटाजवळ म्हसरुळ दिंडोरी रोड नाशिक येथे ‘एक मेळावा माझ्या समाजासाठी ‘ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या ९६ कुळी मराठा शेतकरी नोकरदार व्यावसायिक उपवर तसेच घटस्फोटीत विधूर विधवा वधुवर आणि पालक मेळाव्याचा मेसेज आपण आपापल्या भाऊबंदकीच्या, गावाच्या ग्रुपमध्ये पाठवून सहकार्य करावे मेळाव्याचा मेसेज व्हायरल झाल्यापासून समाजातील सर्वच क्षेत्रातील पालकांचे फोन येत आहेत तरीसुद्धा त्याकरीता या मेळाव्यासाठी आपण समाजकार्य समजून आपल्या भाऊबंदकीतल्या अशा मुला मुलींच्या पालकांशी स्वतः संपर्क करून त्यांना प्रोत्साहित करावे.A gathering for my community

मेळाव्यास जिल्हाभरातून निर्व्यसनी,सुशिक्षित, प्रगतिशील सधन शेतकरी नोकरदार व्यावसायिक मुले मुली उपस्थित राहणार असून त्यांच्याशी सोयरीक करून मुलींच्या आयुष्याचे कल्याण होऊ शकते. मी एकटा सर्वांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून या कार्यास हातभार लावावा ही कळकळीची नम्र विनंती. 🙏

हेही वाचा: These Rules Will Change From 1 January: १ जानेवारीपासून बदलणार हे नियम! अशा फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरकर्त्यांची खाती बंद होणार, काय कारण आहे पहा?


■ मेळाव्याचे ठिकाण हरीकृपा मंगल कार्यालय लॉन्स पाटाजवळ म्हसरुळ दिडोरीरोड नाशिक
■ मेळाव्याची वेळ सकाळी १० ते सायं ५ राहील
🔹 मराठा समाजातील सामाजिक कार्य म्हणून विवाह जमविणारे समाजसेवक यांनी आवर्जुन उपस्थित राहावे
■ सदर मेळाव्या करीता येतांना आपल्या मुला मुलींचा बायोडाटा दोनप्रती तसेच सुसंस्कृत फोटो कॉपी सोबत आणावी
■ पालकांना सोबत आणावे
■ मुला मुलींनी मेळाव्याच्या ठिकाणी एक तास अगोदर येऊन नोंदणी करावी
■ मेळाव्यास येणाऱ्या सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे
🙏संपर्क –
श्री प्रभाकरराव रायते साहेब (सेवानिवृत DYSP ) शिंगवे नाशिक 9049988013
श्री दिलीपकुमार कावळे
बोपेगांव ता दिंडोरी
9423083878 / 8668441806
श्री विलास राजाराम शिदे ( वडनेर भैरव ) 9970246077