पालकमंत्री दादा भुसेंच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

Last Updated on December 2, 2022 by Taluka Post

कोकाटे यांची हमी; वावी उपकेंद्राच्या प्रस्तावास मंजुरी

सिन्नर, ता. १ : शहा येथील वीज केंद्रातून वावी उपकेंद्रासाठी उच्च दाबवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीकडून पालकमंत्र्यांकडे मंगळवारी सादर करण्यात आला. हा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला जाईल असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांना बुधवारी दिल्यानंतर श्री. कोकाटे यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. उपोषण आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा वावी येथील महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे.

?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

शेतीसाठी वीज वितरण कंपनीकडून अखंडित वीजपुरवठा व्हावा, पूर्व भागातील वीज समस्या मार्गी लावण्यासाठी शहा येथील १३२ केव्हीए क्षमतेच्या वीज केंद्रा तून वावी(vavi) व पाथरे उपकेंद्रांना जोडण्यासाठी उच्चदाब वाहिनी टाकावी. यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा आकस्मित निधीतून प्रस्तावित केलेल्या कामास तत्काळ मान्यता द्यावी या मागण्यांसाठी वडांगळीचे माजी सरपंच योगेश घोटेकर, दुशिंगपूरचे सरपंच कानिफनाथ घोटेकर, विजय शिंदे.दत्ता पवार, नितीन अत्रे यांच्यासह पूर्व भागातील शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून वावी येथे उपोषणास घेऊन चर्चा केली. उपोषणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने यासाठी लक्ष घालावे अशी मागणी केली. महावितरणकडून प्रस्ताव प्राप्त होताच त्यावर तत्काळ निर्णय घेण्याचे आश्वासन भुसे यांनी कोकाटे यांना दिले. त्यानंतर आमदार कोकाटे यांनी आंदोलक शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांशी झालेल्या चर्चेवरून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.

याप्रसंगी उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार, कक्ष अभियंता अजय सावळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक विजय सोनवणे, वावीचे माजी सरपंच विजय काटे, सरपंच संदीप राजेभोसले, प्रशांत कर्पे, , कन्हैयालाल भुतडा, रवींद्र पठाडे, संतोष जोशी, विजय शिंदे होते. कचरू घोटेकर आदी उपस्थित होते.