Last Updated on April 18, 2023 by Jyoti S.
Board exam rule : शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा…!
थोडं पण कामाचं
बोर्ड परीक्षा नियम(Board exam rule) : बोर्डाने 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत एक महत्त्वाची सूचना पाठवली आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे अधिक मजबूत करण्यात आली आहेत.
परीक्षेचा पेपर चोरीला गेल्यास, प्राप्त झाला, खरेदी केला, विकला गेला किंवा मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवला गेला तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पाच परीक्षांसाठीही विद्यार्थ्याची हकालपट्टी केली जाईल. तसेच उमेदवारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.बोर्ड परीक्षा नियम
शिक्षण मंडळाकडून दहावी बारावीचे वेळापत्रक जाहीर,
लगेच इथे करा डाऊनलोड
या वर्षी 12वीची परीक्षा हि 21 फेब्रुवारी ते 21 मार्च आणि 10वीची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आवश्यक अशी तयारी सुद्धा केली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या परीक्षांमध्ये अनेक नियम बदलण्यात आले आहेत.
याशिवाय आता कॉपीमुक्त परीक्षा(Board exam rule) आयोजित करण्यासाठी काही कठोर मार्गदर्शक तत्त्वेहि जाहीर करण्यात आली आहेत. कोरोनाच्या परिस्थितीमुळे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या दोन वर्षांत अनेक बदल करून अनेक विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. त्यानंतर बोर्डाने आपला निर्णय बदलला आणि आता परीक्षा नेहमीप्रमाणे होणार आहे.बोर्डाच्या परीक्षेचे नियम