Bull market : येथे भरणारं बैल बाजार

Last Updated on January 5, 2023 by Jyoti S.

Bull market: जिल्ह्यातील बैल बाजार आता पुन्हा गजबजणार पशुपालकांसह व्यापारीवर्गात आनंद

Nashik : मागील दोन महिन्यांपासून नाशिक(Nashik) जिल्ह्यातील घोटी(Ghoti), सिन्नर (sinner)येथील बैल बाजार गोवंशीय जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पी या चर्मरोगामुळे बंद झाला होता. यामुळे शेतकरी, व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले होते.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी मंगळवारी काढलेल्या सुधारित आदेशामुळे शेतकरी पशुपालक तसेच व्यापारीवर्गात आनंद पसरला आहे. बैल बाजार भरविण्यास ग्रीन सिग्नल जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

नाशिक(Nashik) शहरापासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या घोटी येथील बैल बाजार(Bull market) उत्तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तसेच सिन्नर येथील बैल बाजाराची देखील एक वेगळी ओळख आहे.

नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमधून डांगी, खिल्लारी प्रजातीची जनावरे घोटीच्या बाजारात विक्रीसाठी आणली जातात.

2021 साली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बैल बाजाराला(Bull market) फटका बसला होता. गेल्यावर्षी कोरोनाची लाट नियंत्रणात आल्यानंतर बैल बाजार पूर्ववत सुरू झाले.

मात्र, वर्षअखेर लम्पीसारख्या चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा एकदा बाजार बंद करण्याचे संकट ओढावले. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने काढलेल्या नवीन आदेशामुळे शेतकरी, व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

जनावरांच्या वाहतुकीवरील निर्बंध देखील शिथिल करण्यात आले असून, विविध अटी, शर्तीचे पालन करत आता गुरांची वाहतुक जिल्ह्यात कोठेही करता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने घालून दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.

हेही वाचा: Surat-Chennai Greenfield: नाशिक तालुक्यातील गावांची अधिसूचना

येथे भरतो बैल बाजार

पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समिती, घोटी, सिन्नर, लासलगाव, नामपूर (सटाणा) या तालुक्याच्या ठिकाणी भरणारा बैलांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथील बैल बाजार भरविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी यांनी आता बंदी उठविल्याने पुन्हा एकदा जनावरांचे बाजार तालुक्याच्या ठिकाणी गजबजणार आहेत.