
Last Updated on March 30, 2023 by Jyoti S.
Chandwad Technical College
थोडं पण महत्वाचं
Chandwad Technical College : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत एसएचजेबी तन्नारिकेतनच्या प्रकल्पाची रचना आणि कांदा कटिंग मशिनच्या विकासाला एक लाखाचे प्रथम पारितोषिक मिळाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे यांनी दिली.
गुरु गोविंद सिंग तंत्रनिकेतन , नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध तन्नारिकेतनमधील सुमारे ४६ उत्कृष्ट प्रकल्पांनी सहभाग घेतला. यामध्ये चांदवड तन्नारिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कांदा कापणी यंत्र सादर केले. हे यंत्र स्वयंचलित असल्याने शेतकऱ्यांचा कांदा कापण्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि श्रम यांची बचत होते.
हेही वाचा: 1 April Changes 2023 : स्मार्टफोनपासून सिगारेटपर्यंत, १ एप्रिलपासून काय काय महाग आणि काय स्वस्त; पहा
सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे, लोकेश देवरे, दुर्गेश गोसावी यांनी हा प्रकल्प अतिशय उत्कृष्ट पने साकारला. यासाठी त्यांना किशोर सोनवणे आणि प्रकल्प मार्गदर्शक महेश भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. तन्नारिकेतनचे मुख्य समन्वयक राजेंद्रकुमार बंबा, समन्वयक अरविंद भन्साळी, प्राचार्य डॉ.व्ही.ई.के. वानखेडे, प्रकल्प समन्वयक डॉ.जी. डी. शिंदे व मेकॅनिकल विभागाचे प्रमुख डी.व्ही.लोहार यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.