सायक्लॉन डान्स अकॅडमीने थायलंडमध्ये फडकावला तिरंगा

Last Updated on November 22, 2022 by Taluka Post

नाशिक : नाशिकमधील सर्वसामान्य घरातील मुलांना नृत्यामध्ये प्रशिक्षित करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळवून देण्यासाठी सायक्लॉन डान्स ॲकॅडमीने थायलंडमध्ये झालेल्या सामुहिक नृत्य स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत पोहोचत भारताचा तिरंगा थायलंडमध्ये फडकावला. भारतातील शहीद जवानांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या नृत्याने परीक्षक प्रभावित झाले. भारतीय कलाकारांच्या नृत्याला प्रेक्षकांनी स्टॅण्डिंग ओव्हेशन देत प्रतिसाद दिला.

सायक्लॉन डान्स अकॅडमि गेल्या तीन वर्षापासून दुबई, सिंगापूर येथे नृत्य स्पर्धेत सहभागी होत विजेतेपद मिळवित आहे. यावर्षी थायलंडमध्ये अॅकॅडमीने २५० कलाकारांचा चमू सोबत नेला होता. त्यांनी १८५७
मध्ये सारागडी किल्ल्यावर दहा हजार अफगाणी सैन्याला केवळ २१ भारतीय सैनिकांनी दिलेला लढा तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहीद जवानांच्या वीरमरणाची गाथा सादर केली. या कलाकृतीवर परिक्षक कुमार शर्मा, योगेश पाटकर, फिलिपिन्सचे रुएल वरीनदानी, आयोजक मेघा संपत आदी प्रभावित झाले. या नृत्याची कोरिओग्राफी नृत्य दिग्दर्शक जतिंदर चिकी यांनी केले. या कलाकारांच्या या दौऱ्यास चंदुलाल शहा, गोल्डी आनंद, शोभा सोनवणे, डॉ. शशी अहिरे, पो. नि. राजू पाटील, लीना शेख यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते विजेत्या टीमचा सत्कार करण्यात आला आहे .

Comments are closed.