Last Updated on January 5, 2023 by Jyoti S.
Deputy Sarpanch Selection : जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदाचा सोमवारी फैसला
Table of Contents
नाशिक: ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपुष्टात आलेल्या जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन सरपंच आणि सदस्य निवडून आलेले आहेत. उपसरपंचपदाच्या निवडीसाठी येत्या सोमवारी (दि. २) पहिली सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकायांनी दिले असल्याने येत्या सोमवारी पहिल्या सभेने ग्रामपंचायतीच्या कामकाजाला प्रारंभ होणार आहे.
इगतपुरी, नाशिक, निफाड, सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, बागलाण, दिंडोरी, पेठ [व] [बकेश्वर तालुक्यातील एकूण १९६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊन जनतेमधून थेट सरपंच आणि सदस्य केली आहे. निवडून आले आहेत. या ग्रामपंचायतीमधील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली उपसरंपचपदाच्या निवडणुकीची पहिली सभा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नियोजित कार्यक्रमानुसार, गेल्या ३. जानेवारी रोजीच उपसरपंच निवडीची पहिली सभा होणे अपेक्षित होते,(Deputy Sarpanch Selection) परंतु आता येत्या ९ तारखेला निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
9 जानेवारीला ठरणार उपसरपंच
नियोजित कार्यक्रमानुसार, गेल्या ३. जानेवारी रोजीच उपसरपंच निवडीची पहिली सभा होणे अपेक्षित होते, परंतु आता येत्या ९ तारखेला निवडणुकीचा मुहूर्त ठरला आहे. निवडणुकीची प्रक्रिया प्रशासकीयदृष्ट्या सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
…तर सरपंचाचे मत ठरणार निर्णायक
त्या तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार या प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. डिसेंबर महिन्यात निवडणूक होऊन नूतन सरपंच, सदस्य निवडून आले आहेत. सदस्यांमधील दोन्ही उमेदवारांच्या मतांची बेरीज समान झाल्यास सरपंचाचे मत निर्णायक ठरणार आहे.
एकूण १९६ निवडणुकांसाठी मतदान
चांदवड तालुक्यातील ३५, बागलाण ४१, येवला ७, इगतपुरी २. नांदगाव १५, कळंवर १६, त्र्यंबकेश्वर १, निफाड २०, मालेगाव १३, नाशिक १४, देवळा १३, दिंडोरी ६, सिन्नर १२, पेठ १, याप्रमाणे १९६ ग्रामपंचायतींमधील उपसरपंचांसाठी मतदान घेतले जाणार आहे.
हेही वाचा: Sinner Principal Bhabad: महिलांनी स्वसंरक्षणासाठी कराटे कौशल्ये आत्मसात करावीत : प्राचार्य भाबड
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उपसरपंचपदाच्या निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. १९६ ग्रामपंचायतींमध्ये येत्या सोमवारी उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. तहसिलदारांचा निवडणूकीवर लक्ष आहे. ग्रामसेवकांकडून अजेंडा काढण्यात आहे. यानुसार सोमवारी प्रत्येक ग्रामपंचायतीला उपसरपंच ठरेल. -नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी.
सरपंचांच्या कामकाज पुढील आठवड्यापासून
सद्यःस्थितीत या सर्व ग्रामपंचायतींमध्ये मुदत संपलेली असल्यामुळे प्रशासक नियुक्त आहेत. आता जिल्हाधिकाऱ्यानी पहिली सभा घेण्याची तारीख निश्चित केल्याने सरपंचाच्या कामकाजाला खऱ्या अर्थाने पुढील सोमवारपासून प्रारंभ: होणार आहे.