Last Updated on December 28, 2022 by Jyoti S.
Dindori Nashik: नाशिकच्या दिंडोरी परिसरात ‘झाडातून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ फोटो सोशल मिडियात जोरदार वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
Dindori Marathi News: एका गुलमोहराच्या झाडातून चक्क पाण्याचा झरा वाहत असल्याचा नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात जोरदार व्हायरल होत असून लोकांना याचे खूप आश्चर्य व्यक्त केलं जातय, कोणी या पाण्याला हातही लावून बघताय मात्र हा कुठलाही प्रकारचा चमत्कार नसून या सर्व अफवा असल्याचं समोर आल आहे.
सोशल मीडियावर(Dindori) नेटकरी कधी आणि काय आणि कुठे व्हायरल करतील याचा काही नेम नसतो, याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यात आलाच आहे. नाशिकच्या दिंडोरी परिसरात झाडातून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ फोटो सोशल मिडियात वाऱ्यासारखा जोरदार व्हायरल झाला आहे .सदर प्रकार रस्त्यालगत असल्याने अनेक दुचाकी धारकांनी या घटनेचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे . याचबरोबर स्थानिक नागरिकांसह वाहनधारकांनी एकच एकदम गर्दी केली. कुणी व्हिडीओ काढतंय तर कुणी सोशल मीडियावर लाईव्ह करण्यासाठी एकच झुंबड उडाली जात आहे .
दरम्यान या घटनेमुळे परिसरसह जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे . मात्र सर्व नागरिकांनी आता अशा अफवांवर बिलकुल विश्वास न ठेवता, झाड असलेल्या परिसरातील पाईपलाईन तुटल्याने पाण्याला अन्य ठिकाणाहून जागा न मिळत नसल्याने ते पाणी आता चक्क झाडाच्या खोडांतुनच बाहेर पडत आहे असे स्पष्ट झाले .तसेच गुलमोहरांचे झाड जीर्ण स्वरूपांचे असल्याने पाण्यांचा प्रवाह त्यातुन जोरदार वाहात आहे. तरी नागरिकांनी अफावांवर विश्वास ठेवु नये, असे स्थानिक जेष्ठ कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले.