Last Updated on December 8, 2022 by Jyoti S.
Dindori: समर्थ केंद्रामध्ये श्रीदत्त जन्मोत्सव; लाखोंनी केले श्रीगुरुचरित्र पाराय
दिंडोरी (Dindori): येथील केंद्रात सहभागी सेवेकरी, भाविक श्रीगुरुचरित्र अध्यायाचे वाचन करताना.
नाशिक, ता. ७: दिंडोरी(Dindori) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्र तसेच त्र्यंबकेश्वरचे श्री अण्णासाहेब मोरे स्वामी समर्थ गुरुपीठ आणि देश आणि विदेशातील हजारो समर्थ केंद्रामध्ये आज (ता.७) मंगलमय वातावरणात श्रीदत्तात्रेय जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
री १२.३९ मिनिटांच्या मुहूर्तावर ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ असा जयघोष करत भाविकांनी जन्मोत्सव साजरा केला. आठवड्यापासून हजारो समर्थ केंद्रावर श्री. दत्त जयंती सप्ताहाची लगबग होती. या सप्ताहानिमित्ताने हजारो केंद्रात लाखो अबालवृद्ध सेवेकऱ्यांनी श्रीगुरुचरित्र पारायणासह विक्रमी सेवेत सहभाग नोंदवला. दुपारी १२.२७ मिनिटांनी श्रीगुरुचरित्रातील चौथ्या अध्यायाचे वाचन सुरू करण्यात आले.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

ठीक बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी या अध्यायातील ‘तीन बाळे झाली’ या ओवीचे वाचन होताच उपस्थित सेवेकल्यांनी ‘अवधूत चिंतन’ चा जयघोष करत आनंद व्यक्त केला दुपारी यानंतर आरती झाली.दिंडोरी(Dindori) येथे उपस्थित देशभरातून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या सेवेकरी, भाविकांशी गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे तर त्र्यंबकेश्वर गुरुपीठात चंद्रकांतदादा मोरे यांनी हितगूज केले. गुरुमाऊली म्हणाले, ‘आज सर्व भारतीयांना चैतन्य पुरवठा करणाऱ्या, कायम आपल्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या श्रीदत्त महाराजांनीच श्री स्वामी समर्थ रूपात देशभर कार्य करवून घेतले.’
श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून देश आणि समाजासाठी अथकपणे काम सुरु आहे. महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोहळ्यात वेदमूर्ती गणपती व विजयअप्पा शिखरे यांनी हजरी लावली तर मुकुंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले .सिन्नर: चंडियागासाठी सिन्नरला शेकडो भाविकांची उपस्थिती

भारताबाहेरही अमेरिका, इंग्लंड, ओमान, दुबईसह अनेक देशांमधील महानगरातही मोठ्या उत्साहात झाला. विशेषतः बोस्टन, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, डेट्रॉईट, डल्लास, अटल्यांटा, रैले, सैन जोस, लॉस एंजलिस या महानगरामध्ये नव्यानेच सुरू झालेल्या केंद्रात सेवेकऱ्यांनी हा सोहळा मनोभावे साजरा केला.