Last Updated on December 31, 2022 by Jyoti S.
Nashik goa: नाशिकहून गोवा,अहमदाबाद, हैदराबाद विमानसेवा सुरू होणार
Nashik to goa flights: दिवाळी दरम्यान बंद पडलेल्या विमानसेवांमुळे नाराज नाशिककरांना(Nashik goa ) विमान कंपन्यांनी न्यू इयर गिफ्ट दिले आहे.
केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत सुरु होऊन बंद पडलेल्या काही सेवा पुन्हा सुरू होणार असून इंडिगो कंपनीने देखील नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. आता आपल्यासाठी ओझर विमानतळावरून स्पाइस जेटच्या हैदराबाद आणि दिल्ली या दोनच विमान(Nashik to goa flights) सेवा सुरू आहेत.
हेही वाचा: Covid updates: सावधान ! आता मास्क बाहेर काढा रे; तो पुन्हा येतोय..!
आता या कंपनीने समर शेड्युलमध्ये अहमदाबाद-गोवा- बंगळुरू या तीन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.