kites : नाशिककरांना ‘पुष्पा’ पतंगची भुरळ

Last Updated on December 12, 2022 by Jyoti S.

kites:कच्च्या मालाच्या दरांमध्ये वाढ होऊनही यंदाचा पतंगबाजार तेजीत

नाशिक(kites) : साउथ इंडियन चित्रपटाचे दृश्य असलेले बाजारात विक्रीस आलेले पतंग.

नाशिक ता. ११: साउथ इंडियन ‘पुष्पा‘ चित्रपट चर्चेचा विषय ठरला होता. सामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकारी देखील पुण्याच्या नृत्यावर थिरकत होते. त्याची लोकप्रियता अजूनही संपलेली नाही. यंदा संक्रांतीनिमित्त बाजारात दाखल झालेल्या पतंगवर पुष्पा चित्रपटाची छाप बघावयास मिळत असून अन्य सुपरहिट साउथ इंडियन चित्रपटांच्याही पतंग(kites) बाजारात दाखल झाल्या आहे.

आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

चंदेरी नगरीत सध्या साऊथ इंडियन चित्रपटांचे हिंदी रूपांतरित चित्रपट धूम घालत आहे. काही दिवसांपूर्वी चंदन तस्करीवर आधारित प्रसारित ‘पुष्पा’ चित्रपटातील नायक पुष्पाच्या नक्कलेवर सगळे धीरकले.पुष्पासह केजीएफ, ‘आरआरआर’ या चित्रपटांनी चित्रपट नगरीत मोठी धूम केली होती. याच प्रकारच्या अनेक चित्रपटांचा सध्या बोलवाला असून त्यांच्या लोकप्रियतेतून यंदाचा पतंगोत्सवही सुटलेला नाही.आकर्षित होताना दिसून येतात.

दरवर्षी संक्रांत निमित्त बाजारात येणाऱ्या पतंगवर वर्षभरातील लोकप्रिय घटना तसेच सामाजिक आणि मनोरंजन दुनियेतील नावीन्यावर सध्या बोलबाला आधारित संदेश, दृश्यांची पतंगीवर छाप असते. नागरिक देखील याकडे आकर्षित होताना दिसून येतात.Onion Market : नाशिकमध्ये लाल कांद्याचे भाव कोसळले

यंदाच्या पतंगोत्सवासाठी बाजारात दाखल झालेल्या पतंगवर देखील या चित्रपटांच्या दृश्यांची छाप असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीला अर्थात पतंगोत्सवास काही दिवस शिल्लक राहिल्याने इतरही पतंगची मागणी वाढली आहे. पतंगाच्या दुकाने रंगविरंगी विविध प्रकार, कागदाच्या पतंगने(kites) सजल्या आहे. ६ इंच ते ४ फूट पतंग विक्रीस आहे. २ रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत पतंग विक्री होत आहे.

पतंगचे(kites) प्रकार

रामपुरी, हॅप्पी न्यू इयर २०२३, आय लव माय इंडिया, फ्री फायर, प्लॅनेट रायडर, मटका, मार्बल, कापडी, प्रिंटेड मटका, येवला धोबी प्रिंटेड, पारंपारिक कागदी, स्पायडरमॅन, कार्टून.

येथून येतात पतंग(kites)

उत्तर प्रदेश येथील रामपूर, बरेली, कानपूर तसेच गुजरात, सुरत विविध प्रकारच्या पतंग बाजारात विक्रीस येत असतात. गुजरात सुरत पेक्षा रामपूर आणि बरेली येथील पतंगना अधिक मागणी आहे.

संक्रांत निमित्ताने विविध प्रकारच्या आकर्षक पतंग बाजारात दाखल झाल्या आहे. साउथ इंडियन चित्रपटाचे दृश्य असलेल्या पतंग प्रथमच बाजारात विक्रीस आल्या आहे. महागाईमुळे दरांमध्ये ४० टक्के वाढ झाली आहे. माल येण्याचे प्रमाणही कमी आहे. त्याचाही परिणाम दरांवर झाला आहे. -नवाज शेख, पतंग व्यावसायिक

Comments are closed.