Dindori: दिंडोरी तालुक्यात होणार भूसंपादन

Last Updated on December 31, 2022 by Jyoti S.

Dindori: सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

जिल्ह्यातून १२२ किलोमीटरचा मार्ग

९९५ हेक्टर जमीन होणार संपादित

• जिल्ह्यात प्रकल्पासाठी १५ हजार कोटींचा खर्च

■ ३ पॅकेजमध्ये काम करणार ; २०२६ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण असेल

आमच्या दिंडोरी तालुक्याचा ग्रुपला जॉईन करा.

भूसंपादन कंसात गटसंख्या

आंबेगण (५), इंदोरे (१), नाळेगाव (४), पिंपळनारे (७), रासेगाव (१३), ढकांबे (८), थाउर (४)शिवनई (१), उमराळे बु., (१०), वरवंडी (१).

नाशिक : बहुप्रतीक्षित सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पासाठी दिंडोरीतील दुसऱ्या टप्प्याअंतर्गत भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पूर्ण तालुक्यातील १० गावांमधील ५३ गटांसाठी ही सूचना आहे.

केंद्र सरकारच्या भारतमाला योजने अंतर्गत सुरत – चेन्नई हा एक हजार २७० किलोमीटरचा महामार्ग उभारण्यात येणार आहे. महामार्गामुळे आता नाशिक ते सुरत अंतर फक्त १७६ किलोमीटरवर येणार असून, प्रवासाचा कालावधीही पावणेदोन तासांचाच होणार आहे. प्रकल्पासाठी जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी,नाशिक, निफाड व सिर या सहा तालुक्यांतील जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच जमीन प्राधिकरणाने सुरगाणा आणि पेठ वगळता अन्य तालुक्यांतील जमिनींबाबतची अधिसूचना यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे. .

हेही वाचा: Swaminarayan Temple: नाशिकमधील भव्य स्वामीनारायण मंदिर पंचवटीत स्वामी महाराजांचे स्वप्न कसे साकार झाले

दिंडोरी(Dindori) महामार्गासाठी आवश्यक अतिरिक्त जमिनीसाठीची अधिसूचना शुक्रवारी (दि. ३०) घोषित करण्यात आली. तालुक्यातील १० गावांमधील १४. २७४७ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या कालावधीमध्ये लोकांना आक्षेप घेण्याची मुदत असून, त्याबाबत दिंडोरीचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्या लोकांना अर्ज करता येणार आहे.

प्रस्ताव केंद्रस्तरावर जिल्ह्यात आता सहा तालुक्यांतून ग्रीनफिल्ड महामार्ग देखील जाणार आहे. आता पूर्ण जिल्ह्यात सहा तालुक्यांत ३ पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम मार्गी लाग(Dindori)णार आहे असे सांगण्यात आले आहे . तसेच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे दोन पॅकेजचे प्रस्ताव देखील पाठविले आहेत. त्यामध्ये आता नाशिक(nashik) व सिन्नर तसेच निफाड(niphad) आणि दिंडोरी(dindori) या दोन पॅकेजचा देखील समावेश आहे. आता जून २०२३ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांतील भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे प्रशासनाने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहे.