
Last Updated on July 5, 2023 by Jyoti Shinde
MPSC Result 2023
नाशिक : २०२० मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालासाठी सगळेच जण आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अखेर तो दिवस उजाडला,आणि निकाल जाहीर झाला त्यात नाशिक येथील कर्मयोगी करियर अकॅडमीचा संचालक अनिल भिमराव बत्तिसे(Anil Bhimrao Battise) याची police sub inspector पदी निवड झाली असून चांदवड तालुक्यातील शिंदे गावचा हा पहिला पोलीस अधिकारी ठरला. अनिलने २०२०,२०२१,२०२२ अश्या सलग तिन्ही वर्षी परीक्षा दिल्या होत्या. आणि आज २०२० मधील परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला,त्यात अनिलला यश आले.
घरची परिस्थिती अगदी बेताचीच पण त्याचे प्रयत्न जोमाचे ,कष्टाचे फळ,या सर्वांचे एकत्रीकरण करून अनिलने आपली यशाची शिखरे गाठली…!
एक क्षण आनंदाचा

अनिलच्या घरामध्ये आई-वडील,एक भाऊ,वाहिनी,आणि एक बहीण असं छोटेसं कुटुंब आहे, त्याच्या वडिलांचं नाव भिमराव बत्तिसे आणि आईचं नाव कल्पना बत्तिसे,धन्य त्या माता -पित्यांना ज्यांनी अनिलसारखा हिरा शिंदे गावामध्ये जन्माला आणला.अनिलच गाव हे चांदवड तालुक्यातील एक छोटसं खेड गाव शिंदे आहे. आज त्याच्यामुळेच एका छोट्याश्या खेड्याची ओळख ही जगभर झाली आहे.गावातील ग्रामस्थानी अनिलचे भरभरून कौतुक केले.MPSC Result 2023
त्याचे हे यश पाहून आजूबाजूच्या पंचकृषीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे .त्याच्या पुढील वाटचालीसाठी तालुका पोस्टच्या टीम कडून हार्दिक शुभेच्छा! MPSC Result 2023