Last Updated on January 7, 2023 by Taluka Post
नाशिक (Nashik Birth Rate): नाशिक शहरात गेल्या आठ महिन्यांत चौदा हजार घरांमध्ये पाळणा हालला आहे. गेल्या काही वर्षापासून मुलींचा जन्मदर वाढीसाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्याबरोबरच, स्वयंसेवी संस्था, संघटनांनी हा विषय सामाजिक पातळीवर नेल्यामुळे मुलींना जन्मास न घालण्याबाबतची मानसिकता बदलत चालली असून मुलींच्या जन्मदर वाढीसाठी पुन्हा एकदा बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा दिला जातो आहे.
आठ महिन्यांत १४ हजार घरात हालला पाळणा !
१४.८९२ जणांकडे हालला पाळणा
शहरात एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या आठ महिन्यांत १४, ८९२ महिला प्रसूती झाल्या आहेत. (Nashik Birth Rate)प्रसूत होणाऱ्या महिला या शहरातील, शहरालगतच्या गावांतील आहेत. बाळंतपणाची सोय असलेल्या शहरातील खासगी तसेच सरकारी रुग्णालयात या महिलांची प्रसूती करण्यात आली आहे..
जानेवारी ते डिसेंबर २०२२ या दरम्यान ८३४० मुलींचा जन्म झाला आहे.
?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
जन्मदरात मुलांचा जन्मदर अधिक आहे. वर्षभरात शहरात ९४८२ इतक्या मुलांचा जन्म झाला आहे.
मुलींचा टक्का घसरला
दर हजारी मुलांमागे मुलींचा टक्का कमी आहे. एकेकाळी मुलांच्या संख्येच्या तुलनेत अत्यल्प असलेल्या मुलींची संख्या मात्र शासनस्तरावरून मुलींच्या जन्माबाबत केल्या जात असलेल्या जागृतीमुळे सातत्याने वाढत आहे. (Nashik Birth Rate)सध्या शहरात हजार मुलांमागे ८८० मुलींची संख्या आहे.
गरोदर मातांची काळजी
तीन महिन्यांच्या गरोदरपणापासूनच आरोग्य विभागाकडून मातांची काळजी घेतली जाते. त्यांना लसीकरण, औषधे, पोषण आहार व नियमित आरोग्य तपासणी केली जाते. त्याच बरोबर सुरक्षित बाळंतपण केल्यानंतर स्तनदा माता व नवजात बाळाची काळजी घेतली जाते.
मोफत लसीकरणामुळे जन्मदरात वाढ
शासनाने मुलींच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमध्ये मोफत लसीकरणाचाही समावेश आहे. मुलांचा जन्म होताच त्यांचे लसीकरण केले जाते. त्यात बीसीजी, हिपटॉयटीस, कावीळ, गोवर प्रतिबंधक लसी दिल्या जातात. त्यातून मुलांची | प्रतिकारशक्ती वाढीस लागून रोगराईपासून मुक्ती मिळते.
घरी जन्माचे प्रमाण घटले
शहरी भागात आरोग्य व्यवस्थेचे जाळे पोहोचल्यामुळे पूर्वीप्रमाणे आता घरीच माता प्रसूत होण्याच्या प्रमाण कमी आहे. जन्मदाखल्यामुळे शहरी भागात बाळाचा जन्म घरात होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
हेही वाचा: Dindori: नाशिकमध्ये गुलमोहराच्या झाडामधून वाहतंय चक्क पाणी, नेमकं कारण आलं समोर बघा व्हिडिओ!!