
Last Updated on August 9, 2023 by Jyoti Shinde
Nashik district dam position
नाशिक– जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांमध्ये ७ ऑगस्टपर्यंत ६१ टक्के साठा आहे. गंगापूर धरणात ८७ टक्के तर गटसाठा ७२ टक्के आहे. 30 जूनअखेर जिल्ह्यातील जलसाठा 21 टक्के होता, तर गंगापूर धरणात 29 टक्के व गटात 20 टक्के पाणीसाठा होता. परंतु, 31 दिवसांत 24 प्रकल्पांमध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.Nashik district dam position
भावली, हरणबारी, वालदेवी, केळझर ही चार धरणे जास्त पाण्याने भरली आहेत. त्याचबरोबर गंगापूर, दारणा, कडवा धरणांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. पालखेड, पुणेगाव, मुकणे, नांदूरमडमेश्वर, चणकपूर, पुनद धरणांमध्येही साठा वाढला आहे. मात्र 13 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. गेल्या पावसाळ्यात जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली होती. यानंतर धरणाचा साठा कमी झाला. मात्र, आता त्यात वाढ होताना दिसत आहे. अजूनही काही ठिकाणी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे येथे धरणाची पातळी कमी आहे. भविष्यात ही धरणे भरण्याची शक्यता आहे.Nashik district dam position
हेही वाचा: Crop Loan :अजित पवारांचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांना तातडीने कर्ज मिळणार!