Nashik District Election: ऐकावं ते नवलच, नाशिक जिल्ह्यात सारख्या चेहऱ्याचे मतदार?

Last Updated on December 22, 2022 by Taluka Post

Nashik District Election: काय सांगता,नाशिक जिल्ह्यात सारख्या चेहऱ्याचे मतदार? ?आमचा नाशिक बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?

नाशिक (Nashik District Election): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या मतदारयादी पुनःनिरीक्षक कार्यक्रमांतर्गत यादीचे शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया केली जाते. आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून चार वेळा यादीचे पुनःनिरीक्षण करण्यात येत असल्याने अनेक त्रुटी समोर येतात. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील मतदार यादीच सारखेच चेहरे असलेले फोटो आढळून आल्याने आता त्यांची पडताळणी केली जाणार आहे.

१,३८,४९४ मतदार सारख्या चेहऱ्याचे

जिल्ह्यात चेहऱ्यातील साम्य असलेली मतदारकार्ड आढळून आल्याने या चेहऱ्यांच्या कार्डाची पडताळणी केली जाणार आहे. बीएलओ मतदारांपर्यंत पोहोचून छायाचित्राच्या साम्यबाबत तथ्यता जाणून घेणार आहेत.

नावे आणि चेहरे ‘देखील सारखेच ?

मतदाराचे एक सारखे

छायाचित्रे असल्याने नावे, चेहयांची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार दुबार फोटो, नावे झाली असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करून दिली जाणार आहे.

सारख्या चेहयाचे मतदार किती?

एकाच व्यक्तीचे दोन कार्ड,एक रद्द होणार

एकाच मतदाराचे दोन मतदार ओळखपत्र कार्ड सारखेच आढळून आले असल्याने एक मतदान ओळखपत्र रद्द केले जाणार आहे. हे ओळख पत्र दोन वेगवेगळ्या मतदार संघातील, एकाच मतदार संघातील असू शकते.

पडताळणी सुरु

पीएसई रिपोर्ट अर्थात सारखेच फोटो आढळून आले असल्याने व्यक्ती एकच आहेत की चेहऱ्यात साम्य आहे याची पडताळणी केली जाणार आहे. नावे वेगळी पण चेहरे सारखे असतील तर त्याची खात्री केली जाणार आहे. नाव आणि चेहरेही सारखेच असतील तर एक कार्ड रद्द केले जाणार आहे यासाठी बीएलओ कामाला लागले आहेत.

हेही वाचा: BioGas: घरगुती बायोगॅस उभारा; 27 हजार रुपये मिळवा