Last Updated on December 20, 2022 by Taluka Post
Nashik HSC/SSC: बारावीचे ७४,२४६ विद्यार्थी देणार बोर्डाची परीक्षा ?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या दहावी बारावी परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा होणार असून, या परीक्षेसाठी आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून ७४ हजार २४६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली मुली- आहे. दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत होणार असून, ९१ हजार ३९३ विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी या वेळापत्रकानुसार बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला आहे. पालकांनीसुद्धा मुलांचे पत्रक तयार करून आपल्या पी याची परीक्षेसाठी तयारी करून घेण्यास सुरुवात केली असून, अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभरातील अभ्यासाची उजळणी सुरू केली आहे.
बारावीसाठी अर्ज
मुले-४०,७४७
मुली-३३,४९९
एकूण -७४,२४६
हेही वाचा: Chandwad : चांदवडची बेपत्ता मुलगी पालकांच्या स्वाधीन