
Last Updated on December 4, 2022 by Taluka Post
जिल्ह्यात समाधानकारक स्थिती : ९६ टक्के लिंकिंग
?आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
नाशिक: रेशनकार्डला आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेशनकार्डावरील सदस्यांचे आधार लिंकिंग करणे आवश्यक असते. नाशिक जिल्ह्यात ९६ टक्के आधार लिंकिंग झाल्याचे असले तरी येथून पुढे आधार लिंक केले नाही तरी चालेल असे नाही, तर उर्वरित चार टक्के कार्डधारकांनी आधार लिंकिंग करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ग्राहकांचे रेशन बंद करण्याच्या शासनाच्या सूचना असल्याने केव्हाही अशी कारवाई करण्याची वेळ येऊ शकते.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी तसेच गैरव्यवहार टाळण्यासाठी शिधापत्रिका तसेच रेशन दुकाने वायोमेट्रिक पद्धतीने •जोडण्यात आली आहेत. यासाठी ग्राहकांचे रेशनकार्डदेखील आधार लिकिंग करणे गरजेचे झाले आहे. रेशनकार्ड आधार लिकिंग करण्यासाठी केवळ यंत्रणा सुधारणे हा भाग नाही तर ‘वन रेशन वन नेशन’ या उपक्रमाचादेखील हा भाग असल्याने प्रत्येकाला आधार लिंकिंग करावे लागणार आहे. आधार लिंक नसेल तर फारकाळ रेशनकार्ड सुरू राहील याची शाश्वती देण्यात आलेली नाही.
जिल्ह्यात दीड लाख सदस्यांचे लिंकिंग बाकी
जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्यक्रम रेशनकार्डधारक सदस्यांपैकी अजूनही १.३५.७१७ सदस्यांनी आधारकार्ड रेशनकार्डाला जोडलेले नाही,
नोव्हेंबरच्या रेशनसाठी डिसेंबर उजाडला ई-पॉस मशिनच्या गोधळामुळे आगोदरच रेशनचे धान्य वितरणात विलंब होत असताना धान्य वितरणदेखील उशिराने होत असल्याने जवळपास महिनाभराचे अंतर पडले आहे. नोव्हेंबर महिन्याचे रेशनचे धान्य आता डिसेंबरमध्ये प्राप्त झाले आहे. यापूर्वी ऑक्टोबरचे धान्य नोव्हेंबरमध्ये मिळाले होते.