Nashik Mobile Blast: नाशिकमध्ये भीषण अपघात, घरी चार्जिंगला लावलेला असताना मोबाईलचा स्फोट

Last Updated on October 2, 2023 by Jyoti Shinde

Nashik Mobile Blast

नाशिक : नाशिकमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका घरात चार्जिंगला असलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. तर ३ जण जखमी झाले आहेत.

नाशिकमध्ये कुठे घडली घटना?

नाशिकमधील उत्तम नगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका घरात चार्जिंगला असलेल्या मोबाईलचा स्फोट झाला.

या अपघातात स्फोटात ३ जण जखमी झाले आहेत, तर १ जण गंभीर जखमी आहे. स्फोटामुळे घराच्या काचा फुटल्या.

Nashik Mobile Blast

मोबाईलचा स्फोट झाल्याने घराचे नुकसान झाले. मात्र आजूबाजूच्या घरांच्या काचाही तुटलेल्या आहेत.

हेही वाचा: Ethiopia Blast: लष्कर आणि स्थानिक टोळ्यांमध्ये भीषण चकमक; या बॉम्ब हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू.

मोबाईलचा स्फोट झाल्याने ३ जण जखमी झाले. यावरून स्फोटाचे गांभीर्य लक्षात येते. मोबाईल चार्जरमध्ये परफ्यूम होता.

मोबाईल स्फोटातील जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिकच्या उत्तमनगर परिसरात सकाळी ६ वाजता ही घटना घडली.

Nashik Mobile Blast

केवळ नाशिकमध्येच नव्हे, तर देशभरातही चार्जिंगदरम्यान मोबाईलचा स्फोट झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हेही वाचा : AI Chatbot For Students: आता ‘एआय’ शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणार; कानपूर आयआयटीने देशांतर्गत चॅटबॉट विकसित केले!