
Last Updated on November 24, 2022 by Taluka Post
सुमारे तीन हजार पदे भरणार; सेवा प्रवेश नियमावलीला शासनाचा हिरवा कंदील
नाशिक : गेल्या २४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महापालिकेतील नोकरभरतीचा बिगुल अखेर वाजला आहे. अग्निशमन विभागातील ३४८, आरोग्य वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०६ पदांसाठी येत्या १५ दिवसांत भरती प्रक्रियेला सुरूवात होत असून, आणखी दोन-सव्वादोन हजार रिक्त पदांसाठी महापालिका निवडणुकीपूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी येत्या १५ दिवसांत सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे.
महापालिकेतील रिक्तपदांची संख्या २८०० वर गेल्याने प्रशासकीय कामकाजात अडचणी येत आहेत. वाढता आस्थापना खर्च, सुधारित आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियमावलीला शासनाची मान्यता नसल्यामुळे या रिक्त पदांची भरती रखडली होती. कोरोना काळात आरोग्य वैद्यकीय व अग्निशमन अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. परंतु, सेवा प्रवेश नियमावलीची संचिका शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे या पदांची भरती करणे डायनॅमिक लक्झरी प्रकल्प, प्लॉट, फार्म हाउस, व्यावसायिक शॉप्स अभि यांचे देखील असंख्य पर्याय येथे उपलब्ध आहेत. राष्ट्रीय क्रेडाईचे उपाध्यक्ष अनंत पशुवै राजेगावकर, राष्ट्रीय क्रेडाईचे समिती प्रमुख जितूभाई ठक्कर, महाराष्ट्र क्रेडाईचे सचिव मदत सुनील कोतवाल, तसेच माजी अध्यक्ष किरण चव्हाण, सुरेश पाटील, नेमीचंद पोतदार, होती. उमेश वानखेडे यांचे शेल्टरच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन लाभत आहे.
भरती प्रक्रियेसाठी त्रयस्थ संस्था
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, क, ड, या संवगार्तील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस), आयबीपीएस (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या कंपनीमार्फत राबविण्याबाबत शासन निर्णय महापालिकेला बुधवारी (दि. २३) प्राप्त झाला. या दोन्ही संस्थेपैकी एका संस्थेची महापालिकेच्या भरती प्रक्रियेकरिता नियुक्ती केली जाणार आहे.
शासनाच्या निर्णयानुसार टीसीएस किंवा आयबीपीएस या त्रयस्थ संस्थेमार्फत महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रियेत पारदर्शकता असावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज घोडे पाटील(उपायुक्त प्रशासन)