नाशिक: पुतण्यानेच सुपारी देऊन केली काकाची हत्या!

Last Updated on December 5, 2022 by Taluka Post

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे एका ६५ वर्षीय वृद्धाची हत्या केल्याप्रकरणी त्यांच्याच पुतण्यासह एका अल्पवयीन बालकाला अटक करण्यात आली आहे.अंबड-सातपूर लिंक रोडवरील एक्स्लो पॉइंट परिसरातील रहिवासी व शेतकरी बच्चू कर्डेल यांच्या खुनाची अखेर दहा दिवसांनंतर उकल झाली आहे.मृत बच्चू कर्डेल यांच्या भावाच्या मुलानेच अल्पवयीन मुलाच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले आहे.आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

XLO पॉइंट परिसरात कर्डेल कुटुंबीयांची मोठ्याप्रमाणात स्थावर मालमत्ता असून, शेतीही आहे. बच्चू कर्डेल हे गेल्या २५ नोव्हेंबरला रात्री घरात एकटेच होते. तर कुटुंबीय हळदीच्या कार्यक्रमा साठी गेलेले होते. रात्री 10 सुमारास ते घरात एकटे बसलेले असताना संशयित अल्पवयीन मुलाने पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने 2 वार केले. वार जोरात बसल्याने ते जागीच ठार झाले.त्यानंतर संशयिताने घरातील लहान आकारातील कोठी पळवून नेली. कोठीत ७-८ लाखांची रोकड व कागदपत्रे असल्याचे सांगण्यात आले .

अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे मिळत नव्हते.त्याच दिशेने तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे(Important) पुरावे लागले. त्यानुसार, अंबड पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाने रविवारी (ता. ४) पहाटेच्या सुमारास चुंचाळे शिवारातून अल्पवयीन संशयितासह सागर कर्डेल यास त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.नातेवाइकांचे जबाब आणि गुप्त माहितीच्या आधारे सहायक निरीक्षक गणेश शिंदे, उपनिरीक्षक सोनल फडाळे, संदीप पवार, अंमलदार जर्नादन ढाकणे यांना संशयितांची माहिती मिळाली आहे . गुन्हे शाखेसहित आयुक्तालया ची चौदा पथके या गुन्ह्याचा तपास करीत होते.

खूनाचा मुख्य सूत्रधार सागर कर्डेल (वय: २८) याने जमिनीच्या वादातून बच्चू कर्डेल यांच्या खूनाचा कट रचला. त्याने चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या शिवारातील अल्पवयीन मुलास बच्चू कर्डिले या बाबांची खुनाची सुपारी दिली. २५ नोव्हेंबर(Nov) रोजी घरी कोणीच नसल्याची संधी साधून २नी बच्चू कर्डेल यांचा खून केला. त्यानंतर सागर पुन्हा हळदीच्या कार्यक्रमात सामील झाला होता.