Tuesday, February 27

Nashik parking news: नाशिककरांची आता पार्किंगच्या समस्यांतून होणार सुटका !

Last Updated on January 31, 2024 by Jyoti Shinde

Nashik parking news

नाशिक : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या पार्किंगच्या समस्यांनी हैराण झालेल्या नाशिककरांना लवकरच दिलासा मिळणार असून, महापालिका पोलिस यंत्रणेप्रमाणे स्वतःचा वाहतूक सेल निर्माण करणार असून नूतन आकृतिबंधात या सेलसाठी कार्यकारी अभियंता व दोन उपअभियंते या नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई, पुणे महापालिकांमध्ये वाहतूक सेल असून, नाशिक मनपातही तो कार्यरत झाल्यास शहरातील वाहतूककोंडी फोडणे व पार्किंगला शिस्त लावणे सोपे होणार आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत शहरात वाहनतळांची मात्र कमतरताच असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर बनत आहे. शहरात अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच केलेली नसल्यामुळे वाहनधारकांचीच कोंडी होत आहे. वाहतूककोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची नागरिकांची जुनीच मागणी आहे.(Nashik parking news)

असे होते नगरविकास विभागाचे आदेश

शासनाच्या नगरविकास विभागाने वाढते शहरीकरण पाहता महापालिकांनी पोलिस यंत्रणेप्रमाणे वाहतूक सेल निर्माण करावा, असे आदेश दिले होते. त्याचा आधार घेत मुंबईपुणे महापालिकांनी वाहतूक सेल हा स्वतंत्र विभाग निर्माण केला. त्यांच्यामार्फत शहरातील वाहतुकीला शिस्त लावणे, पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देणे, अपघात टाळण्यासाठी उपाययोजना, रस्ते वाहतूक सुरक्षा उपाय, अतिक्रमणमुक्त वाहतूक मार्ग यांसह विविध मुद्यांवर काम केले जाते.

हेही वाचा: Baramati Agriculture Exhibition: टोमॅटोच्या रोपांवर लावले चक्क बटाटे, शेतकऱ्यांना दुहेरी फायदा देणारे तंत्र

उपनगरांमध्येही वाहतूक कोंडीची समस्या

रुंदीकरण करण्यासह पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देत वाहनचा- लकांनी स्वयंशिस्त पाळणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबा- बतही अनेकवेळा मनपाला निवेदन देण्यात आले आहे.(Nashik parking news)

शहराची लोकसंख्या पंचवीस लाखांचा घरात पोहोचली असून, विकासाबरोबर येथे चारचाकी, दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. मुख्य शहरासह उपनगरांमध्येही वाहतूककोंडीची भर पडत आहे.

पार्किंगला जागा नसल्याने शहरातील रस्तेच पाकिंग बनले आहेत. मुख्य बाजारपेठा असो की, कॉलनी रस्ते वाहन पार्किंगसाठी वापरले जात आहेत. नाशिक शहराचा वेगाने होणारा विस्तार व वाहतुकीची समस्या पाहता महापा लिकेने वाहतूक सेल हा विभाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिका लवकरच शासनाकडे आकृतिबंध अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहे. त्यात वाहतूक सेल विभागासाठी कार्यकारी अभियंता व दोन उपअभियंते हे पद समाविष्ट केले आहेत.

नाशिक शहरात पार्किंगची समस्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी नगरविकास विभागाने काढलेल्या अध्यादेशानंतर मुंबई, पुणे या शहरांत महापालिकांचा स्वतःचा वाहतूक सेल विभाग कार्यन्वित केला. नाशिक शहरासाठीही महापालिका हा विभाग निर्माण करणार आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा आकृतिबंधात समावेश करण्यात आला आहे.(Nashik parking news)